नवी दिल्ली। इंडियन प्रीमियर लीग 2020 संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर रवाना होईल. आयपीएलचा अंतिम सामना होताच 32 सदस्यीय संघ थेट युएईहून सिडनीला रवाना होईल. बीसीसीआयने दुबईमध्येच भारतीय खेळाडूंसाठी बायो- बबल तयार केला आहे. या बायो बबलचा भाग असलेल्या रवींद्र जडेजाने एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो पाहून शिखर धवनही गोंधळला.
आयपीएलमधून जे संघ स्पर्धेबाहेर पडले, त्या संघाचा भाग असलेले बहुतेक भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेले खेळाडू यूएईमध्येच सराव करत आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचा भाग आहे आणि आयपीएलमधून चेन्नई सुपर किंग्ज बाहेर पडल्यानंतर तो टीम इंडियाच्या बायो बबलमध्ये दाखल झाला.
रवींद्र जडेजाने शनिवारी (7 नोव्हेंबर) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ट्रेनिंग किटसह एक फोटो शेयर केला आहे. या फोटोत अजिंक्य रहाणेदेखील आहे.
हा फोटो पाहून दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचं डोकं फिरलं. शिखर धवनने यावर टिप्पणी करताना लिहिले की, “अजिंक्य तुझ्यासोबत सरावासाठी कसा काय आला?, उद्या आमचा सामना आहे.”
https://www.instagram.com/p/CHSsR_qFQL9/?utm_source=ig_web_copy_link
यावर जडेजाने उत्तर दिले की, “गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळायचा आहे, म्हणून तो काल रात्रीच आला.”
वास्तविक रहाणे हा दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग आहे. रविवारी (8 नोव्हेंबर ) दिल्लीला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध क्वालिफायर 2 सामना खेळायचा होता. परंतु त्यापूर्वीच रहाणे भारतीय संघाबरोबर दिसला होता.
भारताला ऑस्ट्रेलियाबरोबर तीन वनडे, तीन आंतरराष्ट्रीय टी -20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. 27 नोव्हेंबरपासून हा दौरा सुरू होईल. या दौऱ्यासाठी कसोटी संघात अजिंक्य रहानेचीही निवड झाली आहे.
या दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना दिवस- रात्र असेल. त्यामुळे हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडला शिखर धवन; नावावर केले ३ खास विक्रम
-व्वा रे गब्बर! हैदराबादच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत धवनकडून सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
-एकेकाळी रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करणारा बनला टीम इंडियाचा थ्रो-डाउन विशेषज्ञ
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ