भारतीय संघाचा डाव्या हाताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन हा आपल्या हटके अंदाजसाठी प्रसिद्ध आहे. मैदानावर तो आपल्या आक्रमक अंदाजात प्रतिस्पर्धी संघाला उत्तर देत असतो, तर मैदानाबाहेर तो आपल्या मजेशीर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शिखर धवन हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. त्यांचे मनोरंजन करण्यासाठी तो मजेशीर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो जोश सिद्धूच्या ‘कन कर गल सुन’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिखर धवन ‘कन कर गल सुन’ या प्रसिद्ध गाण्यावर हटके स्टाईलमध्ये डान्स करताना दिसून येत आहे. शिखर धवन जेव्हा झेल टिपतो किंवा सेलिब्रेशन करतो त्यावेळी तो मांडी ठोकून गब्बर स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करतो.
हेच गब्बर स्टाईल सेलिब्रेशन तो डान्स करताना देखील दिसून येत आहे. या व्हिडिओवर कॅप्शन देत त्याने , ‘चमकीला फॉरेवर’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच २ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
शिखर धवनला गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असताना भारतीय संघाचे वनडे आणि टी २० संघाचे कर्णधारपद विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या हाती देण्यात आले होते.
तसेच मंगळवारी (३० नोव्हेंबर) आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येणार आहे. पुढील हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघ शिखर धवनला रिटेन करण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे तो पुढील हंगामात दुसऱ्या संघात खेळताना दिसून येऊ शकतो. ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स संघ रिषभ पंत, अक्षर पटेल,पृथ्वी शॉ आणि एनरीच नॉर्खिया यांना रिटेन करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अबब! क्रिकेटविश्वातील फक्त ‘या’ २ संघांनी कसोटी सामन्याच्या एका डावात चोपल्यात ९०० हून जास्त धावा
‘तो का खेळतोय?’ चाहत्यांकडून ‘या’ भारतीय खेळाडूला संघाबाहेर करण्याची होतेय मागणी
Kanpur Test: भारताच्या ‘या’ ३ चूका, न्यूझीलंडसाठी ठरल्या प्लस पॉईंट; नाहीतर खूप सोपा होता विजय