भारतीय संघाच्या विस्फोटक फलंदाजांमध्ये शिखर धवन याच्या नावाचाही समाेवश होतो. धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तरीही त्याला याची चिंता नाहीये. नुकतेच कसोटी क्रिकेटची सुरुवात करण्याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, त्याने वेळेचे कारण देत म्हटले होते की, आता त्याची कसोटी कारकीर्द संपली आहे. आता तो आयुष्याची मजा घेत आहे. शिखर धवन सध्या क्रिकेटपासून दूर असला, तरीही तो सोशल मीडियामार्फत चाहत्यांशी जोडला आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) हा नेहमी इंस्टाग्रामवर रील्स शेअर करत असतो. रीलमध्ये शिखर धवनचे वडील (Shikhar Dhawan Father) अनेकदा दिसत असात. अशात त्याचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तो वडील आणि बहिणीसोबत दिसत आहे. व्हिडिओत त्याचे वडील त्याला पाणी मागतात. मात्र, तो पाणी देण्यास नकार (Shikhar Dhawan Refuses Give Water To Father) देतो. तो म्हणतो की, “मी जात नाहीये, मी गेम खेळत आहे.” तेवढ्यात त्याची बहीण धवनला ‘उद्धट’ म्हणते. ती वडिलांना म्हणते की, “बाबा, हा तर उद्धटच आहे. तुम्ही स्वत: जावा आणि पाणी प्या.”
शिखर धवनने हा व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये “पापा, तुम्ही स्वत: जाऊन प्या,” असे लिहिले आहे. त्याचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.
https://www.instagram.com/reel/CpxNgWtDwO2/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध मिळालेली संधी
शिखर धवनला टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेनंतर वनडे संघाचे कर्णधार बनवले होते. त्यावेळी धवनने पहिल्या सामन्यात 72 धावांची वादळी खेळी साकारली होती. मात्र, तो शतक करण्यास मुकला होता. त्यानंतर तो बांगलादेश दौऱ्यावरही गेला होता. मात्र, तिथे त्याला खास कामगिरी करता आली नाही. त्याने वनडेतील शेवटचे शतक 2019मध्ये झळकावले होते. त्यानंतर तो दोन वेळा नर्व्हस नाईंटीजचा शिकार झाला. (shikhar dhawan do great acting refuses give water to father in insta reel video viral on social media)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! हरमनप्रीतने भिरकावला चेंडू, पण सीमारेषेवर ‘सुपरवुमन’ हरलीनने पकडला अफलातून कॅच, पाहा Video
वर्ल्डकपनंतर रोहितचा पत्ता कट करून हार्दिक बनू शकतो भारताचा पर्मनंट कॅप्टन, गावसकरांची मोठी भविष्यवाणी