टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन यानं गेल्या वर्षी पत्नी आयशापासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर धवनचा एकुलता एक मुलगा जोरावर हा आयशासोबत राहतो आहे. त्यामुळे धवन आपल्या मुलाला भेटू शकत नाही. 16 जूनला ‘फादर्स डे’च्या दिवशी धवन आपल्या मुलाची आठवण करून खूप भावूक दिसत होता. त्यानं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत मुलगा जोरावरशी बऱ्याच काळापासून संपर्क होत नसल्याचं सांगितलं.
‘फादर्स डे’च्या दिवशी शिखर धवननं एक पोस्ट शेअर करून वडिलांचं अभिनंदन केलं. या पोस्टद्वारेच धवननं सांगितलं की, तो आपल्या मुलाशी संपर्क साधू शकत नाही. धवननं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “वडिलांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. माझ्या मुलाला भेटता न येऊ शकल्यामुळे हा ‘फादर्स डे’ माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी त्याच्याशी संपर्क साधू शकत नाही.” गब्बरच्या या भावनिक पोस्टवर चाहते कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही त्याची ही पोस्ट येथे पाहू शकता.
View this post on Instagram
टीम इंडियाचा विस्फोटक सलामी फलंदाज शिखर धवननं 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. यानंतर 2014 मध्ये दोघांना मुलगा झाला, ज्याचं नाव ‘जोरावर’ आहे. विशेष म्हणजे, आयशा आधीच विवाहित होती आणि तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली होत्या. आयशाला आपल्या मुलींची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियात राहावं लागलं, ज्यामुळे ती भारतात परत येऊ शकली नाही.
रिपोर्ट्सनुसार, आयशानं शिखर धवनला अनेक वर्षांपासून त्याच्या मुलापासून दूर ठेवून मानसिक त्रास दिला होता. धवननं अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, आयशानं त्याला फार कमी वेळा जोरावरला भेटण्याची परवानगी दिली आहे. तो अनेक महिने त्याच्या मुलाशी बोलूही शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
‘फादर्स डे’च्या निमित्त अनुष्काची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, रिंकूनेही दिल्या वडिलांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा!
जगातील तिसऱ्या सर्वोच्च शिखरावर फडकवला मुंबई इंडियन्सचा झेंडा! नीमानं रोहित-सूर्याला दिलेलं वचन पाळलं
कोण आहे सौरभ नेत्रावलकरची पत्नी देवी स्निग्धा मुप्पाला?