शुक्रवारपासून (२३ जुलै) टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंना घवघवीत यश मिळावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आणि क्रिकेटपटूदेखील या स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढवताना दिसून येत आहेत. अशातच श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन याने देखील एक व्हिडिओ शेअर करत या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय कर्णधार शिखर धवन याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने शुभेच्छा देताना म्हटले की “ही खूप अभिमानाची बाब असते जेव्हा एक खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. यावेळी जे खेळाडू टोकियोला जात आहेत, संपूर्ण देशाचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. तुम्ही मनापासून खेळा आणि विजय मिळवा. संपूर्ण देश तुमचे समर्थन करत आहे, तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिंकून या आणि आपण सर्व मिळून विजयाचा जल्लोष साजरा करू.”(shikhar dhawan given good wishes to athletes who praticipated in Tokyo olympics 2020 )
शिखर धवनसह, दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग,फिरकीपटू हरभजन सिंग, कृणाल पंड्या,महिला क्रिकेटपटू हरलीन देओल,माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्यासाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की,”त्या सर्व खेळाडूंना जे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना शुभेच्छा. कुठ्ल्याही परिस्थितीत हार मानू नका.”
Wishing our Indian contingent the very best for #Tokyo2020!
I nominate @sachin_rt @ImZaheer @gauravkapur @ImHarmanpreet @mandhana_smriti to #Cheer4India ????????@ianuragthakur @Olympics @Tokyo2020 https://t.co/hhvgjKWmGS pic.twitter.com/S34oKUld1I
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) July 22, 2021
तसेच फिरकीपटू हरभजन सिंगने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्यासाठी गेलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा. मी अशी प्रार्थना करतो की, जेव्हा तुम्ही भारतात परतणार, तेव्हा तुमच्या गळ्यात पदक असेल. सर्व भारतीयांना विनंती आहे की, त्यांनी या खेळाडूंचा सोशल मीडियाद्वारे उत्साह वाढवावा. तसेच बीसीसीआयने देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू आणि कृणाल पंड्या त्यांना शुभेच्छा देताना दिसून आला आहे.
All the best to our ???????? pride,our athletes who are representing us in #TokyoOlympics I am all for them,are you ?? pic.twitter.com/g0Iswe4kG3
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 22, 2021
.@krunalpandya24 is cheering for our athletes at @Tokyo2020. ???? ????
Let's join him & #Cheer4India ???????? ???? ????@IndiaSports | @Media_SAI | @WeAreTeamIndia pic.twitter.com/CMYdAdWTsr
— BCCI (@BCCI) July 22, 2021
यावर्षी ऑलिम्पिकमध्ये भारताचे एकूण १२७ खेळाडू सहभागी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे पदार्पण करताच संपला संजूचा ६ वर्षांचा वनवास, वाचा सविस्तर
श्रीलंकाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात वादादरम्यान काय झाले होते बोलणे? वाचा सविस्तर
विरोधी संघातून कोहली अन् शास्त्रींना मोठा सल्ला, पंतबाबत सांगितली ‘ही’ महत्त्वपुर्ण गोष्ट