कोरोना व्हायरसमुळे भारत सरकारने संपूर्ण भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंना घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. तरीही क्रिकेटपटू आपल्या फीटनेसवर लक्ष देत घरातील कामांमध्ये हातभार लावून स्वत:ला व्यस्त ठेवत आहेत.
अशामध्ये भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) क्रिकेटची खूप आठवण येत आहे. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. पुजाराच्या या फोटोवर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याला ट्रोल (Troll) केले आहे.
पुजाराने आपला जुना फोटो शेअर करत लिहिले होते की, “या लॉकडाऊनमध्ये मला कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आठवण येत असेल तर ते म्हणजे क्रिकेटच्या मैदानाची.”
पुजाराच्या या फोटोवर धवनने त्याची थट्टा केली आहे. धवनने लिहिले की, “खरंच, आम्हाला तर माहितीच नव्हते की तुला क्रिकेटची आठवण येत आहे. व्वा.”
कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) जर परिस्थिती खराब झाली नसती तर या वेळी सर्व खेळाडू आयपीएल खेळताना दिसले असते. तरी पुजारा आयपीएल खेळत नाही. परंतु तो काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसला असता.
पुजाराने भारतीय संघाकडून आतापर्यंत ७७ कसोटी आणि ५ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४८.६६ च्या सरासरीने ५८४० धावा केल्या आहेत. तर वनडेत त्याने केवळ ५१ धावा केल्या आहेत.
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०१९-२०च्या मोसमात पुजाराने सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या मोसमाच्या अंतिम सामन्यात पुजाराने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. ज्यामुळे सौराष्ट्र संघाला रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकता आले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू