दिग्गज सलामीवीर शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धवननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. धवनची क्रिकेट कारकीर्द खूपच चमकदार राहिली आहे. मात्र यासह तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिला. एकेकाळी शिखर धवनची लव्ह स्टोरी देशभरात चर्चेचा विषय होती, मात्र तिचा शेवट खूप वेदनादायी झाला.
शिखर धवन फेसबुकच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशा मुखर्जीच्या प्रेमात पडला होता. फेसबुकवरचा आयशाचा फोटो पाहून वेडा झालेल्या धवननं तिच्याशी मैत्री केली. फिरकीपटू हरभजन सिंगनं धवनला सांगितलं होतं की, आयशा ही भारतीय वंशाची ऑस्ट्रेलियन बॉक्सर आहे. फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर दोघेही एकमेकांशी बोलू लागले आणि नंतर चांगले मित्र बनले. यानंतर हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 2012 मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगा असून त्याचं नाव ‘जोरावर’ आहे.
आयशा मुखर्जीनं शिखरसोबत दुसरं लग्न केलं होतं. तिला पहिल्या लग्नापासून रिया आणि आलिया या दोन मुली आहेत. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या आयशाची आई इंग्लिश असून, वडील बंगाली आहेत. परदेशात राहूनही आयशा अस्खलित बंगाली बोलू शकते.
या जोडप्यानं 2021 मध्ये एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आयशानं एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे शिखर धवनपासून घटस्फोटाची पुष्टी केली होती. यादरम्यान धवननं आयेशावर अनेक गंभीर आरोप केले होते. धवनला पत्नीमुळे मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचं न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झालं. शिखरनं छळाचं कारण देत घटस्फोटाची केस दाखल केली होती. अखेर दिल्ली न्यायालयानं धवनला घटस्फोट मंजूर केला.
शिखरनं ऑस्ट्रेलियात खरेदी केलेल्या तीन मालमत्तांमध्ये आयशाला 99 टक्के वाटा हवा असल्याचा आरोप केला होता. आयशाला इतर दोन मालमत्तांचंही संयुक्त मालक व्हायचं होतं. याशिवाय कोविड-19 दरम्यान वडिलांना रुग्णालयात नेण्यासाठी आयशानं शिखरशी भांडण केलं होतं. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा शिखरनं ऑस्ट्रेलियातील त्याची सर्व संपत्ती आयशाच्या नावावर करण्यास नकार दिला, तेव्हा हे लग्न तुटलं.
हेही वाचा –
जेव्हा गब्बरनं तुटलेल्या अंगठ्यानं ऑस्ट्रेलियाला धुतलं होतं! धवनची ही खेळी चाहते कधीच विसरणार नाहीत
शिखर धवनला ‘गब्बर’ नाव कसं मिळालं? टोपण नावामागची रंजक कहानी जाणून घ्या
विराट-रोहित नाही तर हा स्टार टीम इंडियाचा ‘कोहिनूर हिरा’, दिग्गज क्रिकेटपटूनं केलं काैतुक