मुंबई । कोरोना वायरच्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भारताचा सलामीवीर ‘गब्बर’ उर्फ शिखर धवन हा मदतीसाठी धावून आला आहे. शनिवारी धवनने मजलीस पार्क मेट्रो स्टेशनच्या जवळ आदर्शनगर येथील काही पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू लोकांना मदत केली.
शिखर धवन तोंडाला मास्क लावून या ठिकाणी पोहोचला आणि त्यांना ‘पोर्टेबल टॉयलेट’ दान केले. तसेच शिखर धवनने रेफ्यूजी कॅम्पमधील लहान मुलांना क्रिकेटचे किट भेट म्हणून दिले. क्रिकेटचे हे किट पाहून मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शिखर धवन या परिसरात येणार याची कोणाला कल्पना नव्हती तो अचानक या ठिकाणी आला.
पोर्टेबल टॉयलेट आणि क्रिकेट किट दिल्यानंतर धवनने लोकांशी संवाद साधला आणि लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी लोकांनीही धवनचे जोरदारपणे स्वागत केले.
Enjoyed my morning with the refugees staying near Majlis Metro Station. Grateful for the kind reception they gave me ????????@PMOIndia @narendramodi @HMOIndia @AmitShah @sanjaysherpuria pic.twitter.com/YdwPmFXSrk
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 4, 2020
यापूर्वी शिखर धवनने कोरोना व्हायरसने पीडित लोकांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पैसे देखील दिले. मात्र याचा कुठेही खुलासा त्याने केला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी –
Eng vs WI: पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने घोषित केला संघ: या अनुभवी खेळाडूला दिले नाही स्थान
हॅट्रिक घेऊन इतिहास रचणाऱ्या महिला क्रिकेटपटूने ‘या’ कर्णधारासोबत केले लग्न
आपण एक मारली तर ते सर्व मिळून आपल्याला खूप मारतील याची भीती वाटायची