इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने संपल्यानंतर लगेचच टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा भारतात होणार होती. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती पाहता ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी सर्वच खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशातच वर्तमान भारतीय संघात असा एक फलंदाज आहे, जो टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलामीवीर शिखर धवनची जागा घेऊ शकतो.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तो टी२० संघात आत बाहेर होतो आहे. श्रीलंका दौऱ्यावर त्याला कर्णधाराची जबाबदारी देण्यात आली होती. त्याने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली होती.
परंतु फलंदाजीमध्ये त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहेत. त्याच्याऐवजी पृथ्वी शॉला संधी दिली जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, धवन आणि शॉ हे आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघात एकमेकांचे संघ सहकारी आहेत.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्माचे स्थान निश्चित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिखर धवन आणि रोहित शर्मा हे दोघे टी२० क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना दिसून येत आहेत. परंतु टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पृथ्वी शॉने शिखर धवनच्या चिंतेत वाढ केली आहे. (Shikhar Dhawan’s place in indian team for in T-20 world in danger)
पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. परंतु या सामन्यात फ्लॉप ठरल्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. त्यानतंर त्याने विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएल स्पर्धेत तुफान फटकेबाजी करत त्याने भारतीय वरिष्ठ संघात जोरदार पुनरागमन केले होते. त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावरील मर्यादित षटकांची मालिकाही गाजवली होती. त्याने अशीच कामगिरी पुढे सुरू ठेवली तर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील शिखर धवनचे स्थान धोक्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दिवशी युएईसाठी उड्डाण भरणार दिल्ली कॅपिटल्सचा ताफा, पण कर्णधाराचा निर्णय गुलदस्त्यात
भर मैदानात तंबू लावून सामन्याचा आनंद लुटू लागला ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ बघून म्हणाल, ‘ओळखीचा दिसतोय’
‘महिलांसाठी ६ संघांची आयपीएल सुरू करा’; स्म्रीती मंधानाची मागणी पूर्ण करणार का बीसीसीआय?