मैदानी प्रदेशात वाढत असलेल्या उष्णतेने आणि कोरोना नियमांमधील शिथिलतेमुळे थंड प्रदेशातील पर्यटनाला गती मिळत आहे. थंड प्रदेशांपैकी एक असलेल्या हिमाचल प्रदेशात आता पर्यटकांसह सेलिब्रिटींच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. एकीकडे भारतीय संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार व यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आपल्या कुटुंबासोबत शुक्रवारी (18 जून) शिमलामध्ये पोहोचला. (Former India veteran arrives in Shimla for holiday)
शिमलामधील पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीसह कुटुंब आणि नातेवाईक असे एकूण 12 लोक शिमलामध्ये पोहोचले आहेत. ते सर्व शिमलामधील हैवन होमस्टे मैहलीमध्ये राहणार आहेत.
.@msdhoni with his squad in Shimla. pic.twitter.com/ejP9HLt0fm
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) June 19, 2021
याआधी ऑगस्ट 2018 मध्येही महेंद्रसिंग धोनी शिमलामध्ये आला होता. यादरम्यान तो एका जाहिरातीचे चित्रीकरण करण्यासाठी आला होता. आता पुन्हा एकदा धोनी शिमलामध्ये आला आहे. 2018 मध्ये धोनी हा एका बँकेच्या डिजिटल पेमेंटच्या जाहिरातीसाठी शिमलामध्ये आला होता. शिमलामध्ये स्मॉल रोड येथे या जाहिरातीचे चित्रीकरण झाले. यादरम्यान धोनीने शिमलामध्ये वळणदार रस्त्यांवर बाईक रायडिंग केली. परंतु सध्या धोनी शिमलामध्ये का आला आहे, याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, उन्हाळ्याची सुट्टी आणि कोरोनापासून थोडी विश्रांती, घेण्यासाठी धोनी शिमलामध्ये आला आहे.
आयपीएल २०२१ चा हंगाम सुरू झाल्यानंतर धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल २०२१चा हंगाम स्थगित करण्यात आला होता. या हंगामातील उर्वरित सामने युएईत खेळण्यात येणार आहेत. हा हंगाम स्थगित करण्यात आला, तेव्हा धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिऱ्याहूनही जास्त चमकतो माझा घाम’, म्हणत धवनने केला फोटो शेअर; रोहितही झाला इंप्रेस
‘किवींना बालपणीपासूनच स्विंग चेंडूची सवय, पण भारतीयांच तसं नाही,’ दिग्गज गोलंदाज चिंतेत