आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे .काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल , ऍरॉन फिंच सारख्या दिग्गज खेळाडूंना संघांनी सोडलेले असल्याने आगामी आयपीएल लीलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या विदेशी खेळाडूंसोबतच हरभजन सिंग, शिवम दुबे, केदार जाधव सारखे अनेक भारतीय स्टार्स देखील या लिलावात सहभागी आहेत.
या सर्वांमध्ये युवा अष्टपैलू शिवम दुबे वर सर्वांच्या नजरा असणार आहेत. आरसीबीने संघातून बाहेर केल्यानंतर दुबेने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली आहे.
दुबेने सध्या सुरू असलेल्या सय्यद मुस्ताक अली टी 20 ट्रॉफीमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दुबेने फलंदाजी सोबतच गोलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली. मुंबईकडून खेळताना दुबेने 5 सामन्यात एकूण 161 धावा केल्या. गोलंदाजीत देखील दूबेने 3 बळी मिळविले आहेत. दूबेच्या या कामगिरीकडे बघितल्यावर आरसीबीने त्याला संघातून सोडल्याची चूक केली की काय, असे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या दुबेला आयपीएलमध्ये मात्र चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुबेने आयपीएल 2020 मध्ये आरसीबीकडून 11 सामने खेळले.या 11 सामन्यात त्याने केवळ 129 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट केवळ 122 राहिला होता. दुबेच्या या खराब कामगिरीमुळेच आरसीबीने त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र सर्व क्रिकेट पंडितांकडून अंदाज वर्तवला जात आहे की दुबे आगामी लिलावामध्ये महागड्या रकमेत विकला जाईल. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की कोणता संघ दुबेला आपल्या ताफ्यात समाविष्ट करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐकावं ते नवलंच! भारतातील ‘या’ दोन क्रिकेट स्टेडियममध्ये आहे गणपतीचे मंदिर
फ्लॅशबॅक! १५ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पहा व्हिडिओ