Loading...

आदित्य शिंदेच्या सुपर टॅकलने सामना बरोबरीत, ५-५ चढाईत एयर इंडियाने मारली बाजी

शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेत काल (४ ऑक्टोबर) विशेष व्यवसायिक गटाच्या बादफेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली. एअर इंडियाने उपांत्य फेरीत तर मुंबई बंदर व महाराष्ट्र पोलीस यासंघानी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

Loading...

मुंबई पोलीस विरुद्ध मुंबई बंदर यांच्यात झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत मुंबई बंदर संघाने ३६-१२ असा सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

तर दुसऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना चुरशीचा झाला. महाराष्ट्र पोलीस विरुद्ध सेंट्रल रेल्वे अशी लढत झाली. मध्यंतरापर्यंत ११-१० अशी नाममात्र आघाडी सेंट्रल रेल्वेकडे होती. महेंद्र राजपूत, रोहित बने, विपुल मोकल आणि बाजीराव होडगे यांनी उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्र पोलीस संघाला २७-२३ असा विजय मिळवून दिला.

Loading...

विशेष व्यवसायिक गटातील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना काल खेळवण्यात आला. एअर इंडिया विरुद्ध सेंट्रल बँक यांच्यात झालेला पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना ५-५ चढाईत खेळवण्यात आला. ३१-३१ असा बरोबरीत सुटलेला हा सामना ५-५ चढाईत ७-५ (३८-३६) असा एयर इंडियाने जिंकला.

सामन्याच्या शेवटच्या चढाईआधी २ गुणांची आघाडी सेंट्रल बँककडे असताना एयर इंडियाच्या आदित्य शिंदेच्या उत्कृष्ट पकडीने (सुपर टॅकल) सामना बरोबरीत सोडवला व ५-५ चढाईत एयर इंडियाने बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

व्यवसायिक अ गटात बँक ऑफ महाराष्ट्र विरुद्ध मुंबई अग्निशमन दल यांच्यात झालेल्या सामन्यांत मुंबई अग्निशमन दलने ४५-१० असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश मिळवला. महाविद्यालयीन गटात सिद्धार्थ कॉलेजने ३४-०९ असा ज्ञानविकास कॉलेजचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.

Loading...
You might also like