fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत आज रंगणार अंतिम सामन्याचा थरार

दादर। शिवनेरी सेवा मंडळ, दादर कबड्डी महोत्सवाचा आज (९ ऑक्टोबर) अंतिम दिवस आहे. मागील १० दिवसापासून सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत आज सर्व गटाचे अंतिम फेरीचे सामने होणार आहेत.

विशेष व्यावसायिक गटात महिंद्रा अँड महिंद्रा समोर महाराष्ट्र पोलीस संघाचे आव्हान असणार आहे. महाराष्ट्र पोलीसमध्ये महेंद्र राजपूत, सुलतान डांगे, बाजीराव होडगे व बिपिन थले यासारखे राष्ट्रीय खेळाडु आहेत. तर महिंद्रा अँड महिंद्रामध्ये स्वप्नील शिंदे, सचिन शिंगाडे, अभिषेक भोजने व ओमकार जाधव हे खेळाडु आहेत.

महिला गटात गतविजेत्या शिवशक्ती महिला संघ विरुद्ध अमर हिंद मंडळ यांच्यात अंतिम सामना होईल. व्यावसायिक ‘अ’ गटात टी बी एम स्पोर्ट्स विरुद्ध इनकम टॅक्स यांच्यात अंतिम लढत होईल. तसेच महाविद्यालयीन गटाच्या अंतिम सामन्यात ठाकूर कॉलेज वंदे मातरम कॉलेज विरुद्ध दोनहात करेल.

अंतिम फेरीच्या सामन्यानंतर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार असून विशेष व्यावसायिक विजेत्या संघाला २०,००० रुपये व आकर्षक चषक. व्यावसायिक अ गट विजेत्या संघास १५,००० रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल.

महिला गटाच्या अंतिम विजेत्या संघास १५,००० रुपये व आकर्षक चषक आणि महाविद्यालयीन गटाच्या अंतिम विजयी संघास ५,००० रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येईल.

विशेष व्यावसायिक व व्यावसायिक अ गटातील मालिकावीर खेळाडूस सोनसाखळी देऊन गौरविण्यात येणार असून महिला गटातील मालिकावीर खेळाडूला सोन्याची नथ व देवीची साडी देऊन गौरविण्यात येईल. तसेच सर्व गटातील सर्वात्कृष्ट चढाई व सर्वात्कृष्ट पकड अशी बक्षिसे देण्यात येतील.

अंतिम फेरीच्या सामन्याचे थेट प्रेक्षणन आपण डी-फोकस स्टुडिओ (DFocus Studio) व खेल कबड्डी (Khel Kabaddi) दोन्ही युट्युब चॅनेलवर पाहू शकता.

You might also like