Loading...

टीम इंडियाचा हा गोलंदाज बनू शकतो ‘किंग ऑफ रिव्हर्स स्विंग’

पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक करताना म्हटले आहे की तो रिव्हर्स स्विंगचा बादशहा बनू शकतो.

शमीने विशाखापट्टणमला 2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामधील पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ‘वनडे विश्वचषकातील पराभवानंतर एकदिवस शमीने मला फोन केला होता आणि म्हणाला त्याला त्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली नाही म्हणून वाईट वाटत आहे.’

‘पण मी त्याला म्हणालो निराश वाटून घेऊ नको. फक्त तूझा फिटनेस कायम ठेव. तूझ्या मायदेशात आता मालिका होणार आहेत आणि तू चांगला खेळशील.’

‘मी शमीला सांगितले, मला त्याने खतरनाक वेगवान गोलंदाज बनावे आणि त्याने फलंदाजांना संघर्ष करायला लावावे असे वाटत आहे. त्याच्याकडे सीम आणि स्विंग आहे. याशिवाय त्याच्याकडे रिव्हर्स स्विंग आहे. जो उपखंडात खूप कमी गोलंदाजांकडे आहे. मी त्याला सांगितले तो रिव्हर्स स्विंगचा बादशाहा बनू शकतो.’

तसेच अख्तर म्हणाला, ‘आता तूम्ही पाहिले त्याने काय केले, त्याने खराब खेळपट्टीवर विकेट्स घेतल्या. मी त्याच्यासाठी आनंदी आहे.’

असे असले तरी पाकिस्तानी गोलंदाज अख्तरकडे मात्र कोणताही सल्ला मागत नसल्याचा खेद त्याने व्यक्त केला आहे.

Loading...

अख्तर म्हणाला, ‘आमचे पाकिस्तानी गोलंदाज त्यांच्या गोलंदाजीत कशी सुधारणा करावी याबद्दल कसलाही सल्ला विचारत नाही. पण शमी सारखे भारतीय गोलंदाज असे सल्ले विचारतात. माझ्या देशासाठी मात्र ही खेदाची गोष्ट आहे.’

You might also like
Loading...