पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला युएईत जोरदार सुरुवात झाली आहे. गुरुवारी (१० जून) झालेल्या सामन्यात लाहोर कलंदर्स आणि पेशावर जाल्मी हे संघ आमने सामने होते. या सामन्यात पेशावर जाल्मी संघाचा फलंदाज आणि प्रसिद्ध भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक याने तुफानी खेळी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
या सामन्यात पेशावर जाल्मी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत संघातील गोलंदाजांनी अवघ्या २५ धावांवर ४ फलंदाजांना माघारी धाडले होते. यानंतर बेन डंक आणि टीम डेविड यांनी मिळून ८१ धावांची भागीदारी केली. डंकने ३३ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या ४८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर लाहोर संघाने डावाखेर ८ बाद १७० धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पेशावर जाल्मी संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली नव्हती. संघाच्या धावा ५ असताना, सलामी फलंदाज पव्हेलियनला परतले होते. पुढे शोएब मलिक आणि डेविड मिलर यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. परंतु त्यांना विजय मिळवून देण्यात अपयश आले होते.
मात्र शोएब मलिकने अवघ्या ४८ चेंडूत ७३ धावांची तुफानी खेळी करत आपल्या नावाचा डंका पिटला. या खेळीमध्ये त्याने सात चौकार आणि चार षटकार लगावले होते. यात मुख्य बाब म्हणजे त्याने अवघ्या ११ चेंडूत ५२ धावा ठोकल्या होत्या.
पेशावर जाल्मी संघाकडून गोलंदाजी करताना फेनियन एलेनने २ गडी बाद केले होते. तर वहाब रियाज, मोहम्मद इरफान, उमेद आसिफ आणि मोहम्मद इमरान या गोलंदाजांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले होते. तर लाहोर संघाकडून राशिद खानने ४ षटकात २० धावा देत ५ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
फिरकीपटू अश्विनला ‘हा’ खतरनाक चेंडू टाकण्याची पाहिजे परवानगी, भज्जीचा होता त्यात हातखंडा
माजी क्रिकेटपटूने निवडला भारत-पाकिस्तान खेळाडूंचा ‘सर्वकालिन टी२० संघ’, पाहा कोणाला बनवले कर्णधार
WTC Final: कसोटीत नाबाद २५४ धावा चोपणाऱ्या ‘मॅक्सभाऊं’ना अडवायचं तरी कसं? विराटची चिंता शिगेला