टी२० विश्वचषकात पाकिस्तानने जबरदस्त प्रदर्शन केले, चाहत्यांनीही त्यांच्या या प्रदर्शनाचे कौतुक देखील केले. आता पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर पाकिस्तान टी२० मालिका खेळत आहे. पाकिस्तानने मालिकेत पहिल्या टी२० सामन्यात बांगलादेशला ४ विकेट्ने पराभूत केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तान संघाचा दिग्गज खेळाडू शोएब मलिक मात्र पहिल्या सामन्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.
शोएब मलिकसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील ४५० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता. पण या सामन्यात एकही धाव करता आली नाही आणि त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे तो सध्या ट्रोल होत आहे.
पाकिस्तानच्या डावाच्या सहाव्या षटकात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान गोलंदाजीसाठी आला होता. त्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शोएबकडून चूक झाली. त्याने या चेंडूवर एक डिफेंसिव शॉट खेळला आणि चेंडू यष्टीरक्षक नुरुल हसनच्या हातात गेला. शोएब त्यावेळी खेळपट्टीवर थांबला होता आणि अगदी थोडा पुढे चालत होता. त्याचा लक्षात आले नाही की, तो क्रिजच्या बाहेर आहे आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आहे.
याच गोष्टीचा यष्टीरक्षक नुरुल हसनने योग्य वेळी फायदा घेतला. त्याने क्षणाचाही विलंब न करता चेंडू स्टंप्सवर फेकून मारला. ही गोष्ट शोएबच्या लक्षात येण्यासाठी आणि तो क्रिजपर्यंत पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याने जेव्हा बॅट क्रिजच्या आत टेकवली, तेव्हा चेंडू स्पंप्सला लागला होता आणि बेल्स हवेत उडाले होते. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी शोएबला बाद करार दिला. शोएबने या सामन्यात तीन चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये त्याला एकही धाव करता आली नाही. शोएबने ज्याप्रकारे स्वतःची विकेट गमावली, त्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
What a bizzare way to get out for Shoaib Malik. 🤣 pic.twitter.com/7DD4EBhA4K
— Abhi (@79off201) November 19, 2021
Nurul Hasan Sohan has done a great job#BANvPAK #pak #ban #Bangladesh #pakistanteam #PakistanCricket #Pakistan pic.twitter.com/wcar9gopKx
— Md.Tanmoy Hasan (@mdtanmoyhasan) November 19, 2021
दरम्यान, या सामन्यात पाकिस्ताने एक वेळी ५ षटकांमध्ये २३ धावा केल्या होत्या आणि त्यांचे तीन विकेट्स गमावले होते. त्यानंतर शोएब मलिक फलंदाजीसाठी आला आणि तो देखील लगेच तंबूत परतला. असे असले तरी, पाकिस्तानने त्यांना मिळालेल्या १२८ धावांच्या लक्ष्याला १९.२ षटकात गाठले. शाबाद खानने शेवटच्या षटकात षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. फखर जमानने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर शाबाद खानने २१ धावांचे योगदान दिले. तसेच मोहम्मद नवाजनेही १८ धावा केल्या आणि नाबाद राहीला.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! टिम पेनसह तब्बल १५ क्रिकेटर्सचा सेक्स स्कँडलमध्ये समावेश, सर्वाधिक खेळाडू पाकिस्तानचे
बांगलादेशविरुद्ध अलीने केली २१९ किमी प्रति ताशी वेगाने गोलंदाजी? सोशल मीडियावर उडाली एकच खळबळ
असे ५ क्रिकेटपटू, ज्यांच्या जीवनावर चित्रपट बनल्यास ठरु शकतो ब्लॉकबस्टर