---Advertisement---

शुबमन गिलला आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियात संधी द्यावी का? हरभजन सिंग यांनी सांगितला निर्णय

On: सोमवार, ऑगस्ट 18, 2025 7:37 PM
---Advertisement---

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी भारतीय टीमची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. या निवडीमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे, शुबमन गिलला (Shubman gill) टीममध्ये स्थान मिळायला हवे का नाही? भारतीय टी20 टीममध्ये आधीच जोरदार फलंदाज आहेत. अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या. अशा वेळी गिलला टीममध्ये घेणे निवडकर्त्यांसाठी एक प्रकारे गोड डोकेदुखी ठरू शकते.

भारताच्या टॉप-6 फलंदाजांच्या स्ट्राइक रेटकडे पाहिले तर गिलचा स्ट्राइक रेट सर्वांत कमी आहे. पण इंग्लंडमधील त्याचा जबरदस्त खेळ आणि त्याआधीचा आयपीएल परफॉर्मन्स पाहता त्याला बाहेर ठेवणे अवघड दिसते. दरम्यान, गिलच्या खेळावर बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आशिया कपसाठी गिलला टीममध्ये घेण्याचं समर्थन केलं आहे. हरभजनच्या मते, गिलला टीममध्ये स्थान नक्की मिळायला हवं.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना हरभजन म्हणाला, गिल हा एक सॉलिड खेळाडू आहे. तो आपला खेळ बदलून सामना फिरवू शकतो. टी20 फॉरमॅटमध्ये फक्त मोठ्या फटक्यांवर भर नसतो. शुबमनने आक्रमक खेळायचं ठरवलं तर तो कोणत्याही गोलंदाजाला भिडू शकतो. कारण त्याची मूलभूत तत्त्वं खूप मजबूत आहेत. अशा पायाभूत तयारीचा फलंदाज कोणत्याही फॉरमॅटमध्ये धावा करू शकतो.

त्याने पुढे सांगितले, आयपीएल पाहिलं तर गिलने प्रत्येक हंगामात धावा केल्या आहेत. त्याने ऑरेंज कॅप जिंकली आहे. तो फक्त 120-130 स्ट्राइक रेटने नाही तर 160 स्ट्राइक रेटनेही फलंदाजी करू शकतो.

हरभजन पुढे म्हणाला, “हो, आपल्या टीममध्ये अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांसारखे स्फोटक खेळाडू आहेत. पण शुबमन गिलला कमी लेखता येणार नाही. तो अत्यंत प्रतिभावान आहे आणि कोणत्याही फॉरमॅटमध्ये जुळवून घेऊ शकतो. तो एक ऑल-फॉरमॅट खेळाडू आहे. माझ्या मते, तो टी20 खेळू शकतो आणि या फॉरमॅटमध्ये वर्चस्वही गाजवू शकतो. आपण प्रेक्षक म्हणून प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकारांची अपेक्षा करतो, पण टीमला असे फलंदाजही लागतात जे लांब खेळून गरज पडल्यास संघाला वाचवू शकतील.

जेव्हा त्याला आशिया कपसाठी स्वतःची टीम निवडायला सांगितली तेव्हा हरभजनने म्हटलं, माझ्या मते टीम अशी असावी: यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग (मध्यक्रमासाठी), कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, के.एल. राहुल, जसप्रीत बुमराह आणि रिषभ पंत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---