टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांनंतर कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीला हरवून पदक पटकावले. संघाच्या या यशात गोलरक्षक पीआर श्रीजेशची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. या कामगिरीनंतर, श्रीजेश केरळचा नवीन नायक बनला आहे. त्याच्याआधी हाच आदर आणि प्रसिद्धी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतलाही मिळाला. तो ही केरळचाच रहिवासी आहे. पण आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव आल्यापासून तो भारतीय संघातून दूर झाला.
श्रीजेशने कांस्यपदक जिंकल्यानंतर श्रीसंत म्हणाला की, ‘माझे नाव पुन्हा जगासमोर आणण्यासाठी भारतीय हॉकी संघाच्या गोलरक्षकाचे मी आभार मानू इच्छितो.’
श्रीसंत म्हणाला की, श्रीजेशने कांस्य पदकाच्या लढतीत जे गोल रोखले, ते खरोखर प्रेरणादायी आहेत. सामन्याच्या शेवटच्या काही क्षणात श्रीजेशच्या बचावामुळेच भारत 41 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकला.
याशिवाय श्रीसंतने काहीदिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने टी-शर्ट घातलेला आहे. ज्याच्या मागच्या बाजूला त्याचे नाव लिहिले होते. पण ते अस्पष्ट होते. यासंदर्भात त्याने लिहिले की ‘माझे नाव टी-शर्टमधून हळूहळू नाहीसे होत आहे. पण माझे मन आणि शरीर, विशेषत: माझा आत्मा, मला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या प्रवासात मला तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छाची गरज आहे. खेळाला निरोप देण्यापुर्वी, मोठा प्रवास करायचा आहे. कधीही हार न मानण्याचा.’
https://www.instagram.com/p/CSMqi33FDKI/
श्रीशांत पुढे म्हणाला की, त्याने श्रीजेशला मेसेज केला आहे आणि त्याच्या उत्तराची वाट पाहत आहे. श्रीजेश आता 33 वर्षांचा आहे. जर त्याने तंदुरुस्ती राखली तर पुढील ऑलिम्पिकमध्येही तो भारतीय संघाकडून खेळू शकतो. श्रीसंत स्वतः देखील 38 वर्षांचा झाला आहे आणि भारतीय संघामध्ये परतण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त आहे. याच वर्षी तो केरळसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला. केरळच्या या वेगवान गोलंदाजाने संकेत दिले आहेत की तो वरिष्ठ दर्जाच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो आणि इतरत्र क्लब क्रिकेट खेळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
मोहम्मद सिराज भिडला इंग्लिश खेळाडूंना; सामन्यादरम्यान स्लेजिंग करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
भन्नाट! रिषभ पंतने बुमराहच्या गोलंदाजीवर सिब्लीचा घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ व्हायरल