आपल्या नवनवीन नृत्याच्या व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणारी धनश्री वर्मा अर्थातच भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याची पत्नी सोशल साईटवर खूपच ऍक्टिव्ह असते. आपल्या नृत्याच्या व्हिडीओ चाहत्यांच्या समोर सादर करून नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. काही दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकरच्या ‘छम्मा छम्मा’ या गाण्यावर देखील नृत्य करणारी धनश्री आता एका वेगळ्याच व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
यावेळी तिच्यासोबत या व्हिडिओमध्ये एका नवीन चेहऱ्याचा समावेश झाला आहे आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आहे.
अलीकडेच धनश्री भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर सोबत नाचताना दिसली आहे. श्रेयस अय्यर सोबतचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. श्रेयसने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने किशला देखील या व्हिडिओमध्ये टॅग केले आहे, जो एक उत्तम छायाचित्रकार तर आहेच पण ‘एमजे ५’ या नामांकित गटनृत्याच्या संघाचा एक भाग देखील आहे. आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक लोकांनी हया व्हिडिओला पसंती दर्शविली आहे.
सदर व्हिडिओमध्ये हे दोघे एकमेकांसोबत सेंट जेएचएनच्या ‘रोसेस’ या गाण्यावर स्टेप डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला अनेक क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.
आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकायची कोणतीच कसर धनश्री सोडत नाही. त्यामुळे आपल्या व्हिडिओमार्फत काहीतरी नवीन आणि वेगळेपणा दाखविण्याचा ती प्रयत्नांत ती असते.
धनश्री वर्मा ही व्यवसायाने डॉक्टर असून सोशल मीडियावर लाखोंच्या आसपास तिचा चाहतावर्ग आहे. तर श्रेयस अय्यरचा चाहतावर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावर असून सध्या तो ‘विजय हजारे स्पर्धेसाठी’ तयारी करत आहे. मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जो रूट फलंदाजीचे सर्वच रेकॉर्ड मोडू शकेल, ‘या’ दिग्गजाने व्यक्त केला विश्वास
बंगलोरच्या संघात संजय बांगर यांची ‘रॉयल’ एंट्री, संघासाठी पार पाडणार ‘ही’ भूमिका
एकेकाळी बूट घ्यायला ही पैसे नसणारी सोनाली शिंगटे आज आहे भारतातील सर्वोत्कृष्ट कबड्डीपटूंपैकी एक