Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरळीचे छपरी! श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, कॅप्शन वाचाच

वरळीचे छपरी! श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, कॅप्शन वाचाच

February 27, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit Sharma Shreyas Iyer

Photo Courtesy: Instagram/Shreyas Iyer


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर यांचा एक फोटो चर्चेचा विषय बनला आहे. अय्यरच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केलेल्या या फोटोचे कॅप्शन खास चर्चेचा विषय ठरत आहेत.

मुंबईकर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सहकारी खेळाडू खेळाडू शार्दुल ठाकुर () याच्या लग्नात सोबत दिसले. शार्दुल ठाकुर  (Shardul Thakur) सोमवारी (27 फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. शार्दुल त्याची प्रेयसी मिताली पारुलकर सोबत सुखी संसाराची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. या दोघांच्या लग्नाआधी प्री-वेडिंग कार्यक्रमात रोहित-अय्यरसह इतर काही भारतीय खेळाडूंनी उफस्थिती लावली. यावेळी रोहितसोबत काढलेला एक फोटो श्रेयस अय्यरने स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केला. या पोटोला कॅप्शन दिले, “वरळीचे छपरी.” सध्या हा फोटो आणि कॅफ्शन जोरदार चर्चेत आहे. (Worli ke chapri)

View this post on Instagram

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा दोघही मुंबईचे राहणारे असून हे कॅप्सन दोघांना लागू होत आहे, असे चाहत्यांचेही मत येत आहे. रोहित आणि अय्यर अनेकदा मैदानात अगदी मुंबईकरांची भाषा बोलताना दिसले आहेत. अय्यरने शेअर केलेल्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

दरम्यान, रोहित आणि श्रेयस सध्या संघासोबत बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहेत. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला असून तिसऱ्या कसोटीपूर्वी खेळाडूंना मोकळा  वेळ मिळाला आहे. 1 मार्च रोजी सुरू होणाऱ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ शक्य ते सर्व प्रयत्न करेल, पण तरीही विजय त्यांच्यासाठी सोपा दिसत नाहीये. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियान संघ भारतीय फिरकी गोलंदाजांपुढे गुडघे टेकताना दिसले. तिसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार पॅट कमिन्स आणि सलामीवीर डेविड वॉर्नर यांना माघार घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.
(Shreyas Iyer has shared a photo with Rohit Sharma captioning Worli’s Zapri)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO । बाबर आझम विरुद्ध शाहीन आफ्रिदी! अखेर चाहत्यांना पाहाला मिळाला ‘तो’ चित्तथरारक चेंडू
VIDEO । बाबर आझम विरुद्ध शाहीन आफ्रिदी! अखेर चाहत्यांना पाहाला मिळाला ‘तो’ चित्तथरारक चेंडू


Next Post
Ravindra-Jadeja

आता कपिल देव आणि जडेजात जास्त फरत नाही! आकडेवारी पाहून तुम्हालाही बसेल विश्वस

Australia Womens

आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये फक्त एक भारतीय खेळाडू! मेग लॅनिंगच्या हातून निसटले कर्णधारपद

Photo Courtesy: iplt20.com

आयपीएलच्या महिनाभर आधीच सट्टाबाजार गरम! मुंबई-चेन्नईला पछाडत ‌'हा' संघ खातोय भाव

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143