वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि न्यूझीलंड पहिल्या उपांत्य सामन्यात समोरासमोर आले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 350 पेक्षा जास्त धावा उभारल्या. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी तुफानी सुरुवात दिल्यानंतर विराट कोहलीने विश्वविक्रमी 50 वे शतक पूर्ण केले. त्याबरोबर त्याने देखील विश्वचषकातील आपले सलग दुसरे शतक झळकावले.
या विश्वचषकात शानदार कामगिरी करत असलेल्या श्रेयसने शुबमन गिल रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मैदानात पाऊल ठेवले. विराट कोहली सोबत त्याने भारतीय डाव सावरत आपले स्पर्धेतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. भारतीय डावाच्या अखेरच्या टप्प्यात त्याने धावांचा वेग वाढवत विश्वचषकातील आपले दुसरे शतक झळकावले.
नेदरलँड्सविरूद्ध झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात त्याने शतक झळकावले होते. त्याने बाद होण्यापूर्वी 70 चेंडूंमध्ये 105 धावा केल्या. यामध्ये चार चौकार व तब्बल आठ षटकारांचा समावेश होत.
(Shreyas Iyer Hits Consecutive ODI World Cup Century Against Newzealand In Semi Final)
महत्वाच्या बातम्या –
World Cup Semi Final: वानखेडेवर लागली सेलिब्रिटींची रांग! बेकहॅमपासून बॉलीवूड स्टेडियममध्ये
एक घाव, दोन तुकडे! वर्ल्डकपमध्ये जगात कुणालाच न जमलेला विक्रम रोहितच्या नावे, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान