भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघासाठी सलामीला आलेल्या युवा शुबमन गिल याने द्विशतक साजरे केले. आपल्या या शानदार खेळीचे श्रेय त्याने भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याला दिले.
यावर्षी भारतातच होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी सलामीचा दावेदार म्हणून गिल प्रयत्न करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक शतक व एक अर्धशतक ठोकलेल्या गिलने या सामन्यात एकहाती संघाची धुरा वाहिली. त्याने 145 चेंडूंवर द्विशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 19 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 149 चेंडूंवर 208 धावांची खेळी केली. आपल्या केवळ 19 व्या सामन्यातच त्याने हा पराक्रम करून दाखवला.
गिलने आपल्या विक्रमी खेळीनंतर बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने आपल्या या यशात भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याचे योगदान असल्याचे म्हटले. गिल म्हणाला,
“युवराज सिंग हा माझ्यासाठी भाऊ आणि एक मार्गदर्शक आहे. त्याने मला लॉकडाऊनच्या काळात त्याने खूप मदत केली. तसेच, खेळ सुधारण्याच्या बाबतही मार्गदर्शन केले.”
गिल 2020-2021 च्या दरम्यान भारतीय संघाबाहेर होता. कोविड लॉकडाऊन काळा तो युवराज सिंग याचे वडील व माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घेताना दिसला होता. भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर त्याने मागील वर्षापासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो मालिकावीर ठरलेला. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर कसोटीत शतक पूर्ण केले होते. तसेच, श्रीलंकेविरुद्ध देखील त्याची कामगिरी लक्षणीय होती.
(Shubham Gill Said Yuvraj Singh Me Like Brother And Mentor)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का! स्टार खेळाडू डोपिंग चाचणीत पाॅझिटिव्ह
द्विशतक होताच सचिनकडून साराचा शुबमनसोबत साखरपुडा फिक्स? ट्विट होतंय व्हायरल