मंगळवारी (दि. 2 मे) गतविजेता गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2023च्या 44व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना केला. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगला. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात संघ सातत्याने दाखवून देत आहे की, ते आयपीएलमधील एक ताकद का आहेत. गुजरात संघाच्या ताकदीबद्दल बोलायचं झालं, तर ते कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नाहीत. मात्र, युवा सलामीवीर शुबमन गिल हा संघासाठी चांगली सुरुवात करून देत असल्यामुळे तो या क्रिकेट प्रकारात संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्याच्यावर चोहो बाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हरभजन सिंगकडून कौतुक
अशात भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने शुबमन गिल (Shubman Gill) याचे कौतुक केले आहे. हरभजनने जोर देऊन म्हटले की, पंजाबचा हा खेळाडू दीर्घ काळ सर्व क्रिकेट प्रकारात भारतीय संघाची सेवा करेल.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन म्हणाला की, “पुढील काही वर्षांमध्ये सर्वांच्या नजरा शुबमन गिलवर असतील. तो क्रिकेट बॉल योग्य वेळी खेळणारा क्रिकेटर म्हणून समोर येतो. तो मोठ्या खेळी खेळेल आणि सर्व क्रिकेट प्रकारात भारतासाठी खेळेल. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी केलेल्या कामगिरीने त्याला आत्मविश्वास दिला असेल.”
तसेच, भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) म्हणाले की, “गिल ज्याप्रकारे फिरकीपटूंवर प्रहार करतो, ते त्याला विशेष खेळाडू बनवते. जेव्हा फिरकीपटू आक्रमण करतात, तेव्हा शुबमन गिल खेळपट्टीवर टिकून राहतो आणि हे गुजरातसाठी चांगले आहे. तो फिरकीपटूंविरुद्ध चांगला खेळतो आणि अनावश्यक धोका उचलत नाही.”
यावेळी मांजरेकरांच्या आकलनाचे समर्थन करत हरभजनने फिरकीपटूंविरुद्ध त्याचे खेळीचेही कौतुक केले. हरभजन पुढे बोलताना म्हणाला की, “गिल फिरकीपटूंविरुद्ध सहजरीत्या खेळतो. तो या कलेचा मास्टर आहे. जर फिरकीपटू गिलला बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त करतात, तेव्हाही त्याचे लक्ष विचलित होत नाही. तो त्याचा वेळ घेतो आणि आपल्या शैलीत खेळतो.”
शुबमन गिलची हंगामातील कामगिरी
शुबमन गिल याने मंगळवारी दिल्लीविरुद्ध भिडण्यापूर्वी आतापर्यंत 8 सामन्यात 41.62च्या सरासरीने 333 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 चौकारांचाही पाऊस पाडला आहे. (shubman gill is a master at reading spinners says harbhajan singh ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी मागे हटणार नाही, हे माझ्या रक्तात…’, विराटसमोर सव्वाशेर का बनतोय नवीन? घ्या जाणून
लखनऊच्या पराभवानंतर दिग्गजाने राहुलला झापले; म्हणाला, ‘आधीच फलंदाजीला का आला नाही?’