ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारताचा सलामीवीर केएल राहुल याची बॅट मागील काही सामन्यांपासून शांत आहे, दुसरीकडे भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याची बॅट मात्र टी20 क्रिकेटमध्ये चांगलीच तळपत आहे. त्याने सुरू असलेल्या सईद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मंगळवारी (1 नोव्हेंबर) शतक झळकावले. त्याने हे शतक कोलकाताच्या इडन गार्डनवर पंजाबकडून खेळताना कर्नाटक विरुद्ध केले.
या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात 23 वर्षीय शुबमन गिल (Shubman Gill) याने अवघ्या 49 चेंडूत ही शतकी खेळी केली आहे. तसेच त्याचे हे टी20 प्रकारातील पहिलेच शतक ठरले आहे. त्याची नुकतीच भारताच्या टी20 संघात निवड झाली. बीसीसीआयने सोमवारी (31 ऑक्टोबर) न्यूझीलंडच्या दौऱ्यातील टी20 आणि वनडे मालिकांसाठी संघ जाहीर केला. त्यामधील दोन्ही संघात गिलचा समावेश आहे.
भारताचा संघ टी20 विश्वचषक झाल्यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील पहिला टी20 सामना 18 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही आराम दिला आहे. यामुळे भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) करणार आहे. गिलने भारताकडून टी20 क्रिकेट खेळलेले नाही. त्याने 2019मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यावर आतापर्यंत 11 कसोटी आणि 12 वनडे सामने खेळले आहेत.
1⃣2⃣6⃣ Runs
5⃣5⃣ Balls
1⃣1⃣ Fours
9⃣ Sixes@ShubmanGill set the stage on fire 🔥 🔥 & scored a sensational TON for Punjab in the #QF1 of the #SyedMushtaqAliT20. 💪 💪 #KARvPUN | @mastercardindiaWatch that stunning knock 🎥 🔽https://t.co/pG2FTfAqGC
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 1, 2022
गिलकडे भारताचा भविष्यातील फलंदाजीचा सुपरस्टार म्हणून पाहिले जाते. त्याने कर्नाटकविरुद्ध सुरूवातीला फलंदाजी करताना 229.09च्या स्ट्राईक रेटने 55 चेंडूत 126 धावा केल्या. त्याने या खेळीतील 98 धावा 20 चेंडूतच केल्या. त्यासाठी त्याने 9 षटकार आणि 11 चौकार मारले आहेत. त्याची ही खेळी पंजाबकडून टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. त्याच्याआधी प्रभसिमरन सिंग याने 2021मध्ये गोव्याविरुद्ध नाबाद 119 धावा केल्या होत्या.
💯 for @ShubmanGill! 👏 👏
What a cracking knock this has been from the right-hander in the #QF1 of the #SyedMushtaqAliT20! 👌 👌 #KARvPUN | @mastercardindia
Follow the match ▶️ https://t.co/be91GGi9k5 pic.twitter.com/OaECrucM6g
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 1, 2022
गिलच्या या तुफानी खेळीमुळे पंजाबने 20 षटकात 4 विकेट्स गमावत 225 धावसंख्या उभारली. अनमोलप्रीत सिंग यानेही उत्तम फलंदाजी केली. त्याने 43 चेंडूत 59 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकडून अभिनव मनोहर (नाबाद 62) आणि मनीष पांडे (45) सर्वाधिक धावा केल्या, मात्र तरीही त्यांनी हा सामना अवघ्या 9 धावांनी गमावला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही येथे विश्वचषक जिंकण्यासाठी आलेलो नाहीत’, थेट कर्णधाराने दिली कबूली
अरे काय हे, बांगलादेशविरुद्धही राहुलच करणार ओपनिंग! हेड कोच द्रविडने सांगितले त्यामागचे कारण