मागील आठवड्यात १८ ते २३ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवून कसोटी क्रिकेटमधील पहिला विश्वविजेता संघ होण्याचा मान मिळवला. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिलला फलंदाजीतून खास काही कामगिरी करता आली नसली तरी त्याच्या शानदार क्षेत्ररक्षणाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून त्याला खास सन्मान मिळाला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावात शुबमनने अनुभवी फलंदाज रॉस टेलरचा अप्रतिम झेल घेतला होता. त्याच्या या झेलाची निवड आयसीसीने प्ले ऑफ द टेस्ट म्हणून केली आहे. आयसीसीने मतांच्या अधारे शुबमनने घेतलेल्या या झेलाला प्ले ऑफ द टेस्टचा विजेता घोषित केला आहे.
शुबमनचा अफलातून झेल
न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ६४ व्या षटकात भारताचा मोहम्मद शमी गोलंदाजी करत होता. त्यावेळी शमीच्या एका चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या रॉस टेलरने पुढे पडलेला चेंडू टेलरने लॉंग ऑफच्या दिशेने काहीसा हवेतून टोलवला होता. मात्र, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये उभ्या असलेल्या शुबमन गिलने उजव्या बाजूला झेपावत हवेमध्ये सुर मारत नेत्रदीपक झेल टिपला होता. या झेलाचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता.
And we have a winner!
Shubman Gill’s stunner to dismiss Ross Taylor has been voted as the @Nissan #POTT – Play of the Test 👏
Watch the catch again 📽️#WTC21 | #INDvNZ pic.twitter.com/a1Tt9zsKen
— ICC (@ICC) June 28, 2021
शुबमन गिल करतो खराब फॉर्मचा सामना
यावर्षीच्या सुरुवातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवलेल्या शुबमनला सध्या खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात इंग्लंड विरुद्धची मालिका खेळला. या कसोटी मालिकेत त्याला ११९ धावाच करता आल्या. तसेच आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वीही त्याला खास काही करता आले नव्हते. त्याने आयपीएलमध्ये यावर्षी ७ सामन्यांत केवळ १३२ धावा केल्या.
एवढेच नाही, तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही गिलची कामगिरी फारशी बरी झाली नाही. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने रोहित शर्मासह ६२ धावांची भागीदारी करत आशा दाखवली होती. मात्र, त्या डावात तो २८ धावांवर नील वॅग्नरकडे झेल देऊन बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याला केवळ ८ धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात तो टीम साऊदीविरुद्ध खेळताना पायचीत झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ आयपीएल हंगामापासून चुरस वाढणार! प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी येणार दोन नवे संघ
ब्रेकिंग! २०२१ टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार सामन्यांना सुरुवात
विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत फ्रेंच ओपन उपविजेत्या त्सित्सिपासला पराभवाचा धक्का