सध्या भारत आणि बांगलादेश या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राममध्ये खेेळवला जोतोय. या सामन्याच्या पहिल्या दिवशी अशी एक घटना घडली जी क्रिकेट इतिहासात आधी कधीही बघायला मिळाली नाही. चट्टोग्रामच्या मैदानावर श्रेयस अय्यर याला अनोखे जीवनदान मिळाले. मात्र. त्यावेळी 77 धावा करत खेळपट्टीवर उभ्या असेलल्या श्रेयस अय्यरच्या बाद झाल्याचा जल्लोष बांगलादेशचे खेळाडू करुन बसले होते. श्रेयसनेही यावर स्मित हास्य केले. आनंद दोन्ही संघाना झाला होता, पण शेवटी आनंद भारताच्या पदरात पडला.
ही घटना भारताच्या डावाच्या 84व्या षटकात घडली. स्ट्राईकवर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) होता आणि गोलंदाजीचा करण्यासाठी इबादत हुसेन (Ebadot Hossain) तयार होता. त्याने फेकलेला चेंडू टप्पा पडून आतल्या बाजूला आला आणि स्टंप्सला स्पर्ष करुन बाहेरच्या दिशेेने गेला. त्यावेळी स्टंप्स आणि बेल्समधील लाल लाईट चमकत होती. डाव्या स्टंपवरील बेल खाचेतून बाहेर आलेली, पण खाली पडली नाही. दोन्ही बेल्स स्टंप्सवर स्थिर झाल्या आणि लाईट चमकणेही बंद झाले. बांगलादेशचे सर्व खेळाडू स्टंप्सच्या अवतीभोवती जमा झाले, हे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते. नियमानुसार जोपर्यंत बेल्स खाली पडत नाही तोपर्यंत फलंदाज बाद ठरवला जात नाही.
An incredible sequence of play in the #BANvIND Test match as @ShreyasIyer15 is bowled by Ebadot Hossain but the 𝗯𝗮𝗶𝗹𝘀 𝗷𝘂𝘀𝘁 𝗿𝗲𝗳𝘂𝘀𝗲 𝘁𝗼 𝗳𝗮𝗹𝗹 🤯
Your reaction on this close 'escape' ❓🤔#SonySportsNetwork #ShreyasIyer pic.twitter.com/q6BXBScVUz
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 14, 2022
श्रेयस अय्यरला याआधी देखील मिळाले होते जीवनदान
श्रेयसला या डावात मिळालेले हे पहिले जीवनदान नव्हते. याआधी देखील त्याला एक जीवनदान मिळाले होते. 76व्या षटकात मेहेदी हसन (Mehidy Hasan) याच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर श्रेयसचा झेल सुटला होता. मेहदीच्या या चेंडूवर श्रेयसने पुढे येवून शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडूपासून लांब राहिला आणि चेंडू पाहिजे तसा बॅटवर न लागल्याने अपेक्षित अंतर गाठता आले नाही. चेंडू सरळ डीपमध्ये इबादत हुसेन याच्या हातात गेला. मात्र, हा सोपा झेल त्याच्या हातातून सुटला. एवढा सोपा झेल हातातून सुटल्यावर सर्व बांगलादेशी खेळाडू हैराण झाले कारण त्यावेळी पुजारा आणि अय्यर यांची भागीदारी तोडण्याची गरज होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अर्जेंटिनासाठी माझा शेवटचा सामना…’, विश्वचषक फायनलनंतर मेसी घेणारा निवृत्ती
बांगलादेश विरुद्ध श्रेयस अय्यरने रचला इतिहास, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडतेय ‘ही’ गोष्ट