बिग बॉस १३ चा विजेता आणि प्रसिध्द बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. गेली अनेक वर्ष दैनंदिन मालिकांमधून टेलिव्हीजन क्षेत्र गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा एक उत्तम अभिनेता होता. परंतु, अनेकांना माहीत नसेल की, त्याला क्रिकेटचेही प्रचंड वेड होते. तसेच अनेकदा तो क्रिकेट खेळताना ही दिसून आला आहे.
सिद्धार्थला होते क्रिकेटचे वेड
चाहत्यांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य करणारा सिद्धार्थ शुक्ला हा उत्तम क्रिकेट खेळायचा. अभिनयाबरोबरच क्रिकेटवरही त्याचे भरपूर प्रेम होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडते. दरम्यान अनेकदा तो सेलिब्रिटी क्रिकेट लीग आणि अभिनेत्यांसोबत चॅरिटी क्रिकेट सामने खेळताना दिसून आला आहे.
सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे, ज्यामध्ये तो घराच्या अंगणात क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. तसेच तो जोरदार स्ट्रोक खेळताना दिसून येत आहे.”
या शोने दिली ओळख
सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० मध्ये मुंबईत झाला होता. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. त्यानंतर २००८ मध्ये तो ‘बाबुल का आंगण छुटे ना’ या मालिकेत पहिल्यांदा झळकला होता. त्यानंतर ‘बालिका वधू’ या मालिकेत केलेल्या पात्रामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली होती.
त्यानंतर त्याने अनेक रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर तो बिग बॉस, खतरों के खिलाडी आणि झलक दिखलाजा सारख्या शोचा विजेता देखील ठरला होता.(Siddharth Shukla who dies because of heart attack loves to play cricket as well)
https://youtu.be/9mL0dM_8cUs
सिद्धार्थच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना,मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयात पोहच्यापूर्वीच त्याने या जगाचा निरोप घेतला होता. त्याला मुंबईच्या कूपर रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चौथ्या कसोटी अश्विनला का घेतलं नाहीस?’ विराट म्हणतोय….
‘वेडेपणा’! आर अश्विनला चौथ्या कसोटीत संधी न दिल्याने दिग्गजांकडून भारतीय संघव्यवस्थापनेवर टीकास्त्र
एवढा भारी रेकाॅर्ड आता जेम्स अँडरसनच्या नावावर झालाय, आधी सचिनचं होतं ‘या’ विक्रमावर राज्य