Loading...

आयर्लंडचे प्रतिनिधित्व केलेल्या या भारतीय खेळाडूने असा केला होता संघर्ष

भारत आणि आयर्लंड संघात नुकतीच 2 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेत भारताने पुर्णपणे वर्चस्व गाजवत आयर्लंडला व्हाईटवॉश दिला.

भारताच्या या विजयाबरोबरच आयर्लंडचे प्रतिनिधित्व केलेल्या एका भारतीय खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले. तो खेळाडू म्हणजे पंजाबचा सिमरनजीत सिंग.

सिमरनजीत सिंगने भारतात असताना विविध वयोगटातील पंजाबच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतू भारतात योग्य संधी न मिळाल्याने त्याने आयर्लंडचा रस्ता धरला होता. या प्रवासाबद्दल त्याने माहिती दिली आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, सिमरनजीत म्हणाला, ” आयर्लंडच्या राष्ट्रीय संघाचा सदस्य बनने माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. आयर्लंडमध्ये भारतापेक्षा जास्त पारदर्शकता आहे. मी जर आज लाईमलाईटमध्ये आलो आहे तर ते सुद्धा फक्त क्रिकेटमुळे.”

तसेच तो जेव्हा भारतात पंजाबकडून क्रिकेट खेळत होता त्यावेळीच्या आठवणींबद्दल सांगताना म्हणाला, “तो काळ माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप निराशाजनक होता. भारताकडून खेळण्याचे माझे स्वप्न तुटले होते.”

Loading...

सिमरनजीत 7 वर्षांपेक्षा जास्त काळ पंजाबच्या ज्यूनियर संघाकडून खेळला. या काळात त्याने धावा तसेच अनेक विकेट्सही घेतल्या.  पण जेव्हा राज्याच्या विरिष्ठ संघाची निवड झाली तेव्हा त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करण्यात आले. तो पंजाबकडून 15, 17 आणि 19 वर्षांखालील संघात खेळला आहे.

पण या कठीण काळातही हार न मानता तो 2005 मध्ये आयर्लंडला गेला. याबद्दल सिमरनजीत म्हणाला, “मी प्रति आठवडा प्रति खेळ पाच युरो देऊन शनिवार- रविवारी क्रिकेट खेळायचो. मी किराणा दुकानातही काम केले जेणे करुन क्रिकेट खेळण्यासाठी पैसे कमावू शकतो.”

Loading...

महत्त्वाच्या बातम्या:

आयसीसी टी20 क्रमवारीत भारताचे स्थान वधारले; आॅस्ट्रेलियाला टाकले मागे

Video: एमएस धोनीच्या चिमुकलीचा हार्दिक पंड्याला जोरदार पाठिंबा

भारतीय खेळडूंनीच विराट कोहलीला अडकवले मोठ्या संकटात

You might also like
Loading...