fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीएमडीटीए-केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरिज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत सहा खेळाडूंचा मानांकीत खेळाडूंना धक्का

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत अवनिश चाफळे, शार्दुल खवळे ,तेज ओक, मोक्ष सुगंधी, आदित्य रानवडे व श्रावणी देशमुख यांनी मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत खळबळजनक निकालाची नोंद केली.

डेक्कन जिमखाना क्लब येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात तिस-या फेरीत बिगर मानांकीत तेज ओकने दुस-या मानांकीत अभिराम निलाखेचा 6-1 असा पराभव केला. अवनिश चाफळेने सातव्या मानांकीत शिवतेज श्रीफुलेचा 6-3 असा तर शार्दुल खवळेने आठव्या मानांकीत अथर्व राऊतचा 6-4 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात तिस-या फेरीत बिगर मानांकीत मोक्ष सुगंधीने सातव्या मानांकीत अनन्मय उपाध्यायचा 6-3 असा तर आदित्य रानवडेने आठव्या मानांकीत दिव्यांक कवितकेचा 6-5(4) असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. मुलींच्या गटात दुस-या फेरीत बिगर मानांकीत श्रावणी देशमुखने आठव्या मानांकीत राजलक्ष्मी देसाईचा 6-2 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-
तिसरी फेरी-
12 वर्षाखालील मुले

अवनिश चाफळे वि.वि शिवतेज श्रीफुले(7) 6-3

शार्दुल खवळे वि.वि अथर्व राऊत (8) 6-4

तेज ओक वि.वि अभिराम निलाखे (2) 6-1

अव्दिक नाटेकर(1) वि.वि आदित्य कामत 6-0

अर्जुन किर्तने(3) वि.वि शौनक रणपीसे 6-0

मनन अगरवाल(5) वि.वि सक्षम भन्साळी 6-2

अर्णव बनसोडे(6) वि.वि रोहन बजाज 6-3

निव गोजीया वि.वि पार्थ काळे 6-1

तिसरी फेरी –

14 वर्षाखालील मुले –

मोक्ष सुगंधी वि.वि अनन्मय उपाध्याय (7) 6-3

आदित्य रानवडे वि.वि दिव्यांक कवितके (8) 6-5(4)

सार्थ बनसोडे(4) वि.वि धृव लिगडे 6-0

अनमोल नागपुरे(2) वि.वि अनिश जोशी 6-0

आर्यन हुड(3) वि.वि शौनक रणपीसे 6-0

पार्थ देवरूखकर(6) वि.वि शादृल खवले 6-1

तेज ओक वि.वि शिवराज श्रीफुले 6-0

केयु म्हेत्रे वि.वि शिवांश कुमार 6-0

14 वर्षाखालील मुली –
दुसरी फेरी – 

श्रावणी देशमुख वि.वि राजलक्ष्मी देसाई (8) 6-2

चिन्मयी बागवे(1) सानिका लुकतुके 6-2

क्षिरीन वाकलकर(6) वि.वि मृणाल शेळके 6-4

श्रृती नानजकर(3) वि.वि निशिता देसाई 6-1

नाव्या भामिडीपती(7) वि.वि श्रावणी पत्की 6-0

You might also like