प्ले-ऑफचे स्वप्न भंगताच कॅप्टन धवनने ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, ‘चूक केली…’

पंजाब किंग्स संघाला शुक्रवारी (दि. 19 मे) आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात मोठा धक्का बसला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने पंजाबला 4 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. तसेच, प्ले-ऑफच्या शर्यतीतूनही बाहेर काढले. या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवनने प्रतिक्रिया दिली. त्याने यावेळी म्हटले की, ते तिन्ही विभागात एकजूट होऊन प्रदर्शन करण्यात अपयशी ठरले. याच कारणामुळे त्यांचा संघ आयपीएल हंगामातून लवकर बाहेर पडला.
काय म्हणाला धवन?
पराभवाने खचलेला शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणाला की, “आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, जितेश शर्मा आणि सॅम करन यांनी मिळून चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले होते. 200 धावा आमच्यासाठी चांगली धावसंख्या ठरली असती. आम्ही प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी केली. मात्र, अनेकदा असे होते की, तिन्ही विभाग चांगली कामगिरी करत नाही. आम्ही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली, पण क्षेत्ररक्षणात चूक केली. झेल सोडले त्यामुळे सामना गमावला. कर्णधार म्हणून मी खूप काही शिकलो आहे. मी सामना अखेरपर्यंत घेऊन जाऊ इच्छित होतो आणि त्यामुळे मी आमच्या महत्त्वाच्या षटकात मुख्य गोलंदाजाला बोलावले. होय, मागील सामन्यात मी हरप्रीतला अखेरचे षटक दिले आणि ते यशस्वी ठरू शकले नव्हते.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही विचार करत होतो की, नेट रनरेटने धावा करायच्या आहेत. ज्याप्रकारचा संघ आमच्याकडे आहे, आम्ही विचार करू की होय आम्ही चूक केली आहे. यशस्वी जयसवालसाठी हा खूपच चांगला वेळ आहे आणि आशा आहे की, हे असेच राहील.”
राजस्थानचा 4 विकेट्सने विजय
खरं तर, साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यात पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाकडून 4 विकेट्सने पराभूत झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 187 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 2 चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवला. राजस्थानकडून देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जयसवाल यांनी अर्धशतकी खेळी साकारली. शिमरॉन हेटमायर यानेही 28 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. रियान पराग यानेही 12 चेंडूत 20 धावा आणि ध्रुव जुरेल याने 4 चेंडूत 10 धावा केल्या. (skipper shikhar dhawan after pbks exit from ipl 2023 read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बटलरच्या नावे झाला आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम, संपूर्ण हंगामातच ठरला ‘झिरो’
राजस्थानसाठी जुरेलची ‘यशस्वी’ फिनिश! पराभवासह पंजाबचे आव्हान संपुष्टात