सध्या भारताचा मर्यादित षटकांचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहेत. श्रीलंका संघाविरुद्ध भारतीय संघाने एकदिवसीय मालिका खेळली आहे. यानंतर या दोन्ही संघात रविवारपासून टी२० मालिका सुरू झाली आहे. भारताच्या या संघाचे नेतृत्व विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन करत आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी होणारी भारताची ही अखेरची टी२० मालिका आहे. त्यामुळे मालिकेबद्दल शिखरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आयसीसी टी२० विश्व चषक स्पर्धा सुरू होण्यासाठी फक्त तीन महिने बाकी राहिलेले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय संघात सलामीवीर फलंदाजाच्या स्थानासाठी जोरदार टक्कर सुरू झाली आहे. धवन व्यतिरिक्त केएल राहुल देखील या शर्यतीत आहेत.
याच संदर्भात धवनने टी२० मालिका सुरु होण्यापूर्वी प्रतिक्रिया दिली की, “ही मालिका खूप महत्वाची आहे. नक्कीच कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याचा स्वत:चा प्रभाव असतो. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन करत असतो, तेव्हा त्याचा नक्कीच मोठा परिणाम होतो. वैयक्तिकरित्या मी या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करून विश्वचषक स्पर्धेमध्ये माझे स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आपण भविष्यात काय होते हे पाहू.”
शिखर धवनने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मागील दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ५२१ आणि ६१८ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे अशी कामगिरी करूनही टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ व्यवस्थापकांची त्याला सलामीवीर म्हणून पहिली पसंती नाही.
धवन पुढे म्हणाला की, “मला असे वाटत आहे की ही मालिका चांगली होणार आहे. शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या संघाने बरीच सुधारणा करून घेतली आहे. श्रीलंका संघ खरोखरच चांगले खेळत आहे. श्रीलंका संघात अनेक युवा खेळाडू आहे, असे अजूनही हा एक चांगला संघ आहे. श्रीलंका संघासोबत यापूर्वी आम्ही तीन सामने खेळले आहेत म्हणून आम्हाला एकमेकांची ताकद व संघाची कमतरता देखील माहित आहे. ही एक चांगली गोष्ट आहे आणि यामुळे दोन्ही संघात स्पर्धा वाढेल.”
श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यानंतर भारतीय संघ रविवारपासून तीन सामन्यांची टी -२० मालिका खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘बार्मी आर्मी की बारमध्ये आर्मी?’, ‘त्या’ ट्विटवर जाफरने शेअर केले मजेदार मीम
संपूर्ण वेळापत्रक: उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार अंतिम सामना
आयपीएल २०२१: ‘या’ दिवशी रंगणार मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा महामुकाबला