मुंबई। इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील 12 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात केकेआरने राजस्थान रॉयल्सचा 37 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 6 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल राजस्थान रॉयल्स संघाने 9 गडी गमावून केवळ 137 धावा केल्या. राजस्थानचा हा तीन सामन्यांमधील पहिला पराभव होता. यापूर्वी राजस्थानने दोन्ही सामने जिंकले होते. त्याचवेळी केकेआरनेही तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.
सामना एकतर्फी होऊनही हा सामना बराच चर्चेत राहिला. या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबरोबरच काही वादही झाले. रॉबिन उथप्पाने चेंडूवर लाळ लावून कोरोनाचा नियम तोडला, तर दुसरीकडे जयदेव उनाडकटला चूकीच्या पद्धतीने बाद दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
मैदानात काय झाले?
वास्तविक, राजस्थान रॉयल्सच्या डावातील 18 व्या षटकात ही घटना घडली. जयदेव उनाडकट दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याच्याबरोबर टॉम करन दुसर्या टोकावर फलंदाजी करीत होता. कुलदीप यादव गोलंदाजी करत होता. 18 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमलेश नगरकोटीने जयदेव उनाडकटला डिप मिड विकेटवर झेलबाद केले. पंचानी त्याला बाद दिले, परंतु उनाडकट तेथून गेला नाही. त्याचे म्हणणे असे होते की, चेंडू स्पायडर कॅमच्या वायरला लागून मध्येच तटला होता. नियमानुसार तो बाद नव्हता.
नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमांनुसार, चेंडू स्पायडर कॅम किंवा त्याच्या केबलला आदळल्यास तो चेंडू डेड मानला जातो. टीव्ही रिप्लेमध्ये पाहून समालोचन करणारे इरफान पठाण आणि आकाश चोप्रा यांनीही सांगितले की, ‘ चेंडू स्पायडर कॅमला लागून माघारी गेला आणि जयदेव उनाडकटला बाद दिले जाऊ शकत नाही, पण शेवटी उनाडकट बाद झाला. ‘ उनाडकट याला अशाप्रकारे बाद दिल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावरही आक्षेप घेतला. तसेच पंचांना ट्रोल केले आहे.
Strange things happen. Jaydev Unadkat's big hit has hit the Spider cam cable he was expecting it to be called a dead ball but umpires have made the decision of OUT #RRvKKR #IPL2020 pic.twitter.com/DuWe1KXaBh
— Abhijeet ♞ (@TheYorkerBall) September 30, 2020
Umpires to Jaydev Unadkat. #RRvsKKR pic.twitter.com/eb2Z5oDNRB
— Ashru (@humorash) September 30, 2020
Unadkat ko vishwas nahi ho raha ke 11.5 crore ka shot boundary ke bahar kaise nahi gaya!
— The Lying Lama 2.0 (@KyaUkhaadLega) September 30, 2020
Kuldeep's luck is so bad even Spidercam doesn't want a wicket for him. #IPL
— Silly Point (@FarziCricketer) September 30, 2020
Unadkat wicket decision closes the life long question “jhaad ko lag ke catch out hota hai”
— Priyank Yadav (@priyank16) September 30, 2020
Jaydev Unadkat claiming a deflection off the spider cam's wire.
One wicket Kuldeep Yadav gets and that's being checked too. #IPL2020 #RRvsKKR
— Prasen Moudgal (@Prasen_m4299) September 30, 2020
उनाडकटने या सामन्यात 13 चेंडूत ९ धावा केल्या.