---Advertisement---

सांगली एक्सप्रेस सुसाट! मंधनाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळीसह ७२ वर्षे जुन्या विक्रमालाही धक्का

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 1:29 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव दिवस-रात्र कसोटीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ स्म्रीती मंधनाच्या शतकीय खेळीने मजबूत स्थितीत पोहचला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच गडी गमावून २७६ धावा केल्या होत्या. दीप्ती शर्मा १२ आणि तान्या भाटिया ० धावांवर नाबाद आहेत.

पहिल्या दिवशी ८० धावांवर नाबाद राहिलेल्या सलामीवीर स्म्रीतीने दुसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावले. तिने २१६ चेंडूत १२७ धावांची शानदार खेळी खेळली. आपल्या खेळी दरम्यान तिने २२ चौकार आणि एक षटकार ठोकला. तिच्या उत्कृष्ट खेळीमुळे या सामन्यात भारताची पकड मजबूत झाली आहे. तिच्या या अद्भुत खेळीने तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारी परदेशी महिला फलंदाज म्हणून स्म्रीतीने आपले नावे विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम आधी इंग्लडच्या मॉली हाईड यांच्या नावे होता. त्यांनी १९४९ साली सिडनी येथे १२४ धावांची खेळी केली होती. तिसऱ्या स्थानी इंग्लच्याच मर्टल मॅक्लेगन आहेत. त्यांनी १९३५ साली सिडनी येथे ११९ धावांची खेळी केली होती.
तर २०११ साली शार्लोट एडवर्ड्स हिने सिडनी येथे नाबाद ११४ धावांची खेळी केली होती.

याशिवाय, ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारी स्म्रीती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. आणखी विशेष बाब म्हणजे, ती पहिली महिला खेळाडू आहे, जिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडूच्या सामन्यात शतक झळकावले आहे.

तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस आल्यानंतर मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवशी पूनम राऊतने ३६ धावा केल्या, तिने तब्बल १६५ चेंडू खेळून काढले, यादरम्यान तिने २ चौकार लागावले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मिताली राजने ३० धावा केल्या, ती धावबाद झाली. मितालीने ८६ चेंडूंचा सामना करत ५ चौकार लागावले.

याशिवाय यास्तिका भाटियाने १९ धावांचे योगदान दिले. तिने तीन चौकार लागावले. दुसऱ्या दिवसाचा खेळही खराब प्रकाश असल्याने लवकर थांबवण्यात आला. पहिल्या दिवशीही असेच घडले होते. पहिल्या दिवशी फक्त ४४.१ षटके खेळता आली. भारताने पहिल्या दिवशी एक गडी गमावून १३२ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

महेला जयवर्धनेने हार्दिक पांड्याचे पितळ पाडले उघडे, फिटनेसबद्दल दिली महत्त्वाची माहिती

विक्रमी शतक झळकावल्यानंतर मंधनावर कौतुकाचा वर्षाव, या माजी क्रिकेटरने म्हटले ‘ऑफ साईडची देवी’

धोनीचं मास्टरमाईंड की आणखी काही? काय आहे सीएसकेचे सर्वात आधी प्लेऑफमध्ये पोहचण्याचं कारण; घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---