---Advertisement---

आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्काराची घोषणा, भारताच्या ‘या’ खेळाडूनं मारली बाजी

---Advertisement---

आयसीसीनं जून महिन्याच्या ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. पुरुषांमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली असून महिलांमध्ये भारताचीच स्टार फलंदाज स्मृती मंधानानं बाजी मारली आहे.

जसप्रीत बुमराहनं नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात जबरदस्त कामगिरी केली होती. तो स्पर्धेचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ होता. जसप्रीत बुमराहसह भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज हे देखील हा पुरस्कार मिळवण्याच्या दावेदारांमध्ये होते. परंतु अखेर बुमराहनं बाजी मारली.

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीनं भारताला टी20 विश्वचषक चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बुमराहनं विश्वचषकातील 8 सामन्यात 29.4 षटकं टाकत 15 विकेट घेतल्या. या दरम्यानं त्याची सरासरी 8.26 आणि इकॉनॉमी रेट 4.17 इतका उत्कृष्ट होता.

जसप्रीत बुमराहनं आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 6 धावा देऊन 2 बळी घेतले. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध कमी धावसंख्येचा बचाव करताना 3 बळी घेऊन भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बुमराहनं सुपर 8 टप्प्यात 6 विकेट घेतल्या होत्या. त्यानं उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 2 बळी घेतले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातही 2 बळी घेतले होते.

जसप्रीत बुमराहनं आयसीसीचा हा विशेष पुरस्कार जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. बुमराह म्हणाला, “जून महिन्यासाठी आयसीसी खेळाडू ऑफ मंथ म्हणून निवड झाल्यानं मला आनंद झाला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये काही आठवडे अविस्मरणीय राहिल्यानंतर हा माझ्यासाठी विशेष सन्मान आहे. मी या स्पर्धेत चांगली कामगिरी करणं आणि शेवटी ट्रॉफी जिंकणं हे विशेष आहे. मी या आठवणी कायम जपेन”

जसप्रीत बुमराहनं यावेळी पुरस्काराच्या दावेदारांमध्ये समाविष्ट असलेल्या रोहित शर्मा आणि रहमानउल्ला गुरबाज यांचंही अभिनंदन केलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीचं स्वप्नातील घर पाहिलं का? उत्कृष्ट इंटीरियर, सुंदर लोकेशन; किती आहे किंमत?
पाऊस कितीही असो, मॅच कधीच थांबणार नाही! येथे बनत आहे जगातील पहिलं अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम
टीम इंडियाला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’, अभिषेक शर्मानं मोडला हिटमॅनचा मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---