क्रिकेटमध्ये अनेकदा पावसामुळे किंवा खराब हवामानामुळे व्यत्यय आलेला पाहण्यात येतो. मात्र आजपासून(9 डिसेंबर) सुरु झालेल्या रणजी ट्रॉफी 2019-20 स्पर्धतील विदर्भ विरुद्ध आंध्रप्रदेश सामन्यात सुरुवातीलाच सापामुळे व्यत्यय आला होता.
आजपासून रणजी ट्रॉफी 2019-20 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हा रणजी ट्रॉफीचा 86 वा हंगाम आहे. या हंगामात गतविजेत्या विदर्भ संघाचा पहिला सामना आंध्रप्रदेश विरुद्ध विजयवाडा येथे होत आहे.
मात्र हा सामना सुरु होण्याआधी मैदानात एक साप आला होता. त्यामुळे या सामन्याला सुरुवात होण्यास थोडा उशीर झाला. याचा व्हिडिओ बीसीसीआयच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
झाले असे की विदर्भाने या सामन्यातील नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात आले. परंतू सामन्यातील पहिला चेंडू पडण्याआधीच मैदानात सापाने हजेरी लावली. या सापाला बाहेर काढण्यासाठी ग्राउंड स्टाफने प्रयत्न केले. अखेर सापाला बाहेर काढल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली.
SNAKE STOPS PLAY! There was a visitor on the field to delay the start of the match.
Follow it live – https://t.co/MrXmWO1GFo#APvVID @paytm #RanjiTrophy pic.twitter.com/1GptRSyUHq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 9, 2019
हा सामना विदर्भाचा अनुभवी फलंदाज वासिम जाफरचा रणजी ट्रॉफी कारकिर्दीतील 150 वा सामना आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
आजपासून सुरू होणारा रणजी हंगाम आजवरचा सर्वाधिक मोठा; जाणून घ्या सर्वकाही…
वाचा????https://t.co/EfiZDvUd12????#RanjiTrophy #म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019
रोहित शर्माला मागे टाकत किंग कोहली त्या खास यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान!
वाचा????https://t.co/fUAPERnV5D????#म #मराठी #INDvsWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 9, 2019