वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैनचा स्पर्धेतील सर्वाधिक 107 गुणांचा ब्रेक
पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने सलग तिसरा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने रॅक एम अप संघाचा 3-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. पहिल्या सामन्यात वाडेश्वर विझार्डसच्या आशुतोष पाधीने रॅक एम अपच्या मयंक भावसारचा 01-38, 67-05, 44-37, 57-44 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात ह्रितिक जैन याने सुमित सादुलकरचा 30-32, 74-42, 51-04, 61-39 असा पराभव करून वाडेश्वर विझार्डसला 2-0अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या लढतीत वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत विशाल वायावर 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36 असा सनसनाटी विजय मिळवला. यामध्ये हिमांशू जैन याने चौथ्या फ्रेममध्ये 107 गुणांचा ब्रेक नोंदवून संघाचा विजय सुकर केला. अन्य लढतीत वाडेश्वर विझार्डस संघाने अनुक्रमे एमपी स्ट्रायकर्स व कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाचा 2-1अशा सारख्याच फरकाने पराभव करून आपले बाद फेरीतील स्थान निश्चित केले.
ब गटात अरुण बर्वे, रोहित नारगोलकर, सलील देशपांडे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी जायंट्स संघाने डेक्कन रुकीज संघावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. ग गटात द बॉल हॉग्ज संघाने147 पूल अँड स्नूकर संघाचा 3-0 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून अशोक शांडिल्या, लौकिक पठारे, आदित्य अगरवाल यांनी सुरेख कामगिरी बजावली. तर, दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने बीएसएसए मास्टर्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तिसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्लब ब संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. इ गटात केएसबीए संघाने डेक्कन रायनोजचा 2-1असा तर दुसऱ्या सामन्यात ऑटो पॉट्स संघाचा 2-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
गट अ: क्यू मास्टर्स ब वि.वि.क्यू क्लब किलर्स 2-1(आर्यन राजहंस पराभूत वि.विशाल रजनी 00-48, 60-27, 16-27, 27-61; तुषार सावनी वि.वि.प्रसाद परांदे 44-01, 54-33, 22-20; अभिषेक श्रीवास्तव वि.वि.अमरदीप घोडके 09-40, 54-62, 43-09, 55-41, 31-12);
गट ब: पीवायसी जायंट्स वि.वि.डेक्कन रुकीज 3-0(अरुण बर्वे वि.वि.श्रीवत्स शेवडे 30-40, 37-44, 44-33, 51-40, 40-21; रोहित नारगोलकर वि.वि.राजेंद्र आढाव 41-09, 11-61, 30-05, 60-24; सलील देशपांडे वि.वि.अश्विन पळणीतकर 22-35, 63-56, 18-26, 78-45, 53-21);
गट क: कॉर्नर पॉकेट क्युईस्ट वि.वि.क्यू क्लब ऍक्सेस् 3-0(राहुल सचदेव वि.वि.सत्चित जामगावकर 27-37, 115(100)-08, 45-10, 78-23; मुकुंद भराडिया वि.वि.निलेश पाटणकर 69(46)-00, 76-25, 50(50)-10; हसन बदामी वि.वि.अभिषेक बोरा 50-25, 61(61)-00, 42-11);
गट इ: केएसबीए वि.वि.डेक्कन रायनोज 3-0(योगेश कुमार वि.वि.प्रशांत पोवार 47-01, 62-38, 36-09; एम.एस.अरुण वि.वि.संतोष धर्माधिकारी 45-00, 65-18, 38-16; दक्ष रेड्डी वि.वि.विठ्ठल ढमाले 34-16, 83-30, 48-30);
गट इ: केएसबीए वि.वि.ऑटो पॉट्स 2-1( एम.एस.अरुण वि.वि.पारस शहा 05-33, 53-52, 47-07, 59-60, 36-26; दक्ष रेड्डी पराभूत वि.सिद्देश मुळे 28-35, 19-63, 46-15, 53-64; योगेश कुमार वि.वि.लव बोरीचा 19-40, 69-19, 40-11, 35-45, 49-16);
गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.बीएसएसए मास्टर्स 2-1(अशोक शांडिल्या वि.वि.अभिमन्यू गांधी 36-33, 67-55, 29-09; आदित्य अगरवाल पराभूत वि.आनंद रघुवंशी 37-40, 45-70, 17-44; लौकिक पठारे वि.वि.रोवीन डिसुझा 40-02, 31-52, 61-36, 73-69, 41-01);
गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.147 पूल अँड स्नूकर 3-0( अशोक शांडिल्या वि.वि.मनोज गाडगीळ 46-16, 70-25, 37-02; लौकिक पठारे वि.वि.चैतन्य हळबे 28-18, 21-57, 35-42, 68-41, 49-00; आदित्य अगरवाल वि.वि.सचिन बिचे 58-00, 70-10, 40-12);
गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.पूना क्लब ब 3-0(आदित्य अगरवाल वि.वि.पंकज परमार 59-07, 74-09, 80-18; रोहन साकळकर वि.वि.कुणाल वासवानी 39-09, 51-10, 18-27, 59-25; लौकिक पठारे वि.वि.कुमार शिंदे 35-14, 58-78, 35-25, 74-67);
गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.रॅक एम अप 3-0(आशुतोष पाधी वि.वि.मयंक भावसार 01-38, 67-05, 44-37, 57-44; ह्रितिक जैन वि.वि.सुमित सादुलकर 30-32, 74-42, 51-04, 61-39; हिमांशू जैन वि.वि.विशाल वाया 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36);
गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.एमपी स्ट्रायकर्स 2-1(आशुतोष पाधी वि.वि.केतन चावला 19-39, 64-35, 37-33, 67-55; ह्रितिक जैन वि.वि.भरत सिसोडिया 34-16, 80-11, 37-24; हिमांशू जैन पराभूत वि.अनुराग गिरी 06-56, 80-00, 44-16, 50-60, 17-38);
गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.कॉर्नर पॉकेट शूटर्स 2-1(आशुतोष पाधी पराभूत वि.साद सय्यद 05-45, 14-63, 02-32; हिमांशू जैन वि.वि.तहा खान 00-(52)61, 83-47, 43-21, 77-08; ह्रितिक जैन वि.वि.संकेत मुथा 43-17, 72-04, 45-33);