fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सॉफ्टबॉल लीग शुक्रवारपासून पुण्यात रंगणार

स्पर्धेत १२ संघांचा समावेश : २८ ते ३० डिसेंबर दरम्यान रंगणार स्पर्धा

पुणे । एएवाय’एस सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे आयोजन २८ ते ३० डिसेंबर दरम्यान स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून सॉफ्टबॉल खेळाच्या प्रचारासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील लढती सकाळी १० वाजल्यापासून सुरु होतील अशी माहिती एएवाय’एस सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे व सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.

या स्पर्धेमध्ये १२ संघ खेळणार असून मुंबई, नागपूर, सांगली, पुणे, चंडीगड, इंदोर, छत्तीसगड, बंगलोर, नाशिक येथील सुमारे १७५ खेळाडू सहभागी होणार आहेत. हे खेळाडू कुमार प्रॉपरटीज, मोहर व्हेंचर्स, अॅमनोरा (सिटी ग्रुप), चॅम्पियन युपीएस, सार्थक कॉर्पोरेशन, एसके ग्रुप, रचना लाईफस्टाईल, मुकुल माधव फाउंडेशन, एसजी व्हेंचर्स, व्होटेक्सा बॅटरीज, साईशा इन्फोटेक, मुळशी पॅटर्न या संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावर्षी स्पर्धेत गौरव चौधरी, सुमेध तळवलकर, दीपक कुमार हे आंतरराष्ट्रीय खेळाडू तर, योगेश जागडे, श्रीकांत मारटकर, शुभम काटकर हे राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे उदघाटन आयकर विभागाचे सहआयुक्त अमित दुवा, सहाय्यक आयुक्त (क्रीडा) किशोरी शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून असून यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी, एसपी बिर्यानीजचे जवाहर चोरगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सॉफ्टबॉल खेळाला आंतरविद्यापीठ स्पर्धेत स्थान मिळवून देणारे प्रा. एल. टी. देशमुख यांना तसेच आयकर अधिकारी व ज्येष्ठ खेळाडू अजय परदेशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार, अशी माहिती सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीच्या विराट खेळीने लक्ष्मणचा व्हेरी व्हेरी स्पेशल विक्रम मोडीत

रिकी पाॅटिंगच्या देशात त्याच्या आवडत्या मैदानावरच विराट मोडला पाॅटिंगचा विक्रम

८६ वर्षांत कोणत्याही भारतीयला न जमलेली गोष्ट मयांक अगरवालने पदार्पणातच केली

You might also like