इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल सध्या एक वादाचा विषय ठरताना दिसत आहे. अनेक विदेशी क्रिकटपटू आयपीएलवर टीका करत आहेत. अनेकांच्या मते आयपीएलमुळे खेळाडू राष्ट्रीय संघाला महत्व देत नाहीत. बीसीसीआय मात्र, भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक एडम गिलक्रिस्ट याने प्रश्न उपस्थित केले होते. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना गिलक्रिस्टच्या या प्रश्नांवर उत्तर देण्याचे काम एकप्रकारे केले आहे.
काही आयपीएल फ्रँचायझींनी अलिकडच्या काळात आयपीएलव्यतिरिक्त इतरही लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत. यावर देखली एडन गिलक्रिस्टने प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्या या प्रश्नांवार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी उत्तर दिले की, खेळाडूंना थकवा येऊ नके यासाठीच बीसीसीआय त्यांना देशाबारेच्या लीगमध्ये खेळू देत नाही. गावसकर म्हणाले, “काही माजी विदेशी खेळाडू म्हटले की, भारतीय खेळाडूंना बीग बॅस लीग किंवा द हंड्रेड खेळण्याची परवानगी दिली गेली पाहिजे.”
“मुळात त्यांची इच्छा हिच आहे की, त्यांच्या लीगला अधिक प्रायोजक मिळावेत. त्यांना स्वतःच्या क्रिकेटविषयी चिंता आहे, जे पूर्णपणे समजते. पण भारतीय संघ जेव्हा त्यांच्या क्रिकेटचे संरक्षण करण्यासाठी आणि खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्यासाठी विदेशात खेळण्याची परवानगी देत नाही, तेव्हा क्रिकेटच्या ‘जुन्या शक्ती’चे लोक हे मान्य करत नाहीत,” असे गावसकर पुढे बोलताना म्हणाले. गावसकरांनी जुन्या शक्ती हा शब्द यासाठी वापरला की, एकेकाळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही क्रिकेट बोर्ड सर्वात मोठे होते. आज बीसीसीआयने त्यांची जागा काबीज केली आहे.
गावसकरांच्या मते भारतीय खेळाडूंना विदेशी लीग खेळण्याची संधी दिली जात नाही म्हणून प्रश्न उपस्थित होतात. मात्र, खेळाडूंच्या या प्रदर्शनामागे सपोर्ट स्टाफ आणि संघ व्यवस्थापनाची मेहनत मात्र इतरांना दिसत नाही. मागच्या काही वर्षाय या सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचे घळ सध्या दिसत आहे, असेही गावसकरांनी म्हणाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 | ‘बुमराहाची कमी संघाला जाणवेल, पण…’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया
‘अर्शदीप सिंग ठरतोय आवेश खानपेक्षाही वरचंढ’, भारताच्या माजी दिग्गजाने केलाय दावा
आशिया कप क्वालिफायर्सचे वेळापत्रक झाले जाहीर; हे चार संघ भारत-पाकिस्तानशी भिडण्याचे दावेदार