भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर निशाना साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी क्रिकेटपटू नेहमीच आयपीएलबाबत तुच्छ भावनेने चर्चा करतात. त्यांनी पुढे म्हटले की आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून बीसीसीआयचा यात काहीही संबंध नाही.
नुकत्याच काही पाकिस्तानी क्रिकेटपटूंद्वारे आयपीएलविरुद्ध केलेल्या वक्तव्याबाबत मदन लाल चर्चा करत होते.
एका टीव्ही चॅनेलशी बोलताना १९८३ सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असणाऱ्या मदन लाल यांना पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलचा भाग होते, तेव्हा ते आयपीएलला जगातील सर्वात मोठी लीग असल्याचे म्हणत होते. परंतु आता त्यांच्या नजरेत आयपीएल एक साधी स्पर्धा झाली आहे.
मदन लाल यांनी हेदेखील म्हटले की अनेक पाकिस्तानी खेळाडू कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करताना कोणताही विचार करत नाहीत.
ते म्हणाले, “अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू बोलण्यापूर्वी विचार करत नाहीत. शेवटी भारत विश्वचषक कसा काय स्थगित करू शकतो.”
मदन लाल यांना वाटते की, टी२० विश्वचषक स्थगित करण्यात बीसीसीआयचा काहीही संबंध नाही. त्यांनी म्हटले की कोविड-१९ मुळे आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला.
“सर्वप्रथम कोविड-१९ चा प्रसार झाला होता. आणि टी२० विश्वचषक ही वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे. यांमध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीचा आणि प्रायोजकत्वाचा मुद्दाही आहे. त्यामुळे आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला, जो एका चांगला निर्णय आहे,” असेही मदन लाल पुढे म्हणाले.
शोएब अख्तर आणि राशिद लतीफने केला होता आरोप
पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानच्या एका यूट्यूब चॅनेलवर बोलताना हा आरोप केला होता की, बीसीसीआयने आपल्या ताकदीचा वापर करत टी२० विश्वचषक स्थगित केला आहे. अख्तरच्या या वक्तव्याशी माजी यष्टीरक्षक आणि कर्णधार राशिद लतीफही सहमत असल्याचे दिसले होते. तरीही वसीम अक्रमने त्यानंतर या वक्तव्याशी असहमत असल्याचे म्हटले होते. अक्रमने म्हटले होते, सहा महिन्यांपूर्वीपासूनच हे निश्चित असल्याचे वाटत होते की, या वर्षी विश्वचषक होणार नाही. आणि भारताचा यामध्ये कोणताही संबंध नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
-भारतातील ‘या’ क्रिकेट असोसिएशनची ३ मैदाने क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज
-भारतातच होणार २०२१चा टी२० विश्वचषक तर २०२२मध्ये होणार…
ट्रेंडिंग लेख –
-फलंदाजांच्या कानाजवळून शिट्टीचा आवाज काढत जाणारे चेंडू टाकण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेला गोलंदाज
-सर ब्रॅडमननंतर ऑस्ट्रेलियाचा डंका जगभर वाजवणारा दुसरा क्रिकेटर
-आयपीएल २०२०: हे ५ फलंदाजांच्या बॅटमधून यंदा होऊ शकते षटकारांची बरसात