भारतात सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेत आत्तापर्यंत युवा खेळाडूंबरोबरच अनेक अनुभवी खेळाडूंनीही आपली छाप पाडली आहे. आयपीएल २०२२ चा हंगाम सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे, कारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने आयपीएल २०२२ महत्त्वाची स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे. पण, असे असताना भारतीय चाहत्यांना चिंता सतावत आहे ती रोहित शर्मा याच्या फॉर्मची. मात्र, आता युवराज सिंग याने त्याच्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
रोहितची आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी
रोहितची (Rohit Sharma) आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्याने या आयपीएल हंगामात ११ सामन्यांत १८.१८ च्या सरासरीने केवळ २०० धावा केल्या आहेत. त्याने या ११ सामन्यांत एकदाही अर्धशतक केलेले नाही. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे गेल्या १९ आयपीएल डावात रोहितला ५० धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. त्याने गेल्या १९ डावात अनुक्रमे १४, ३५, ३३, ४३, ०८, ०७, २२, १८, ४१, १०, ०३, २६, २८, ०६, शून्य, ३९, ०२, ४५, ०२ अशा धावा केल्या आहेत.
युवराजचा रोहितवर विश्वास
रोहितचा खराब फॉर्मपाहून अनेकांना चिंता वाटत आहे. पण भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) रोहितवर विश्वास दाखवला आहे. त्याने रोहितसाठी खास ट्विट केले आहे. त्याने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘हिटमॅन! सध्या तो दुर्भाग्याचा सामना करत आहे. रोहित शर्माकडून काहीतरी मोठे होणार आहे, चांगल्या मनस्थितीत राहा.’ युवराजला या ट्विटमधून असे सुचवायचे आहे की, लवकरच रोहितकडून मोठी खेळी पाहायला मिळू शकते.
Hitman !! Is having some bad luck . @ImRo45 something big is coming !!!stay in a good space 💪 #Prediction
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) May 10, 2022
मुंबईचीही खराब कामगिरी
केवळ रोहितच नाही, तर तो नेतृत्व करत असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचीही कामगिरी आयपीएल २०२२ मध्ये खराब झाली. मुंबईने आत्तापर्यंत या आयपीएलच्या १५ व्या हंगामात ११ सामन्यांत केवळ २ सामने जिंकले असून ९ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ ला लागणार समारोप समारंभाचा तडका, ‘या’ सेलिब्रेटिंचा परफॉर्मन्स होण्याची शक्यता
डी कॉकने चेंडू पकडला अन् हार्दिकने डोकं धरलं, पाहा नक्की काय झालं
धक्कादायक! मुंबईतील धावपटू जवळपास महिन्याभरापासून बेपत्ता, ‘हे’ गंभीर कारण असण्याची शक्यता