गेल्या दोन वर्षात अफगानिस्तान क्रिकेट संघांने आणि खासकरून फिरकी गोलंदाज रशिद खानने आपल्या कामगिरीने साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष आकर्षित केले आहे.
सध्या आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या रशिद खानने मर्यादित षटकांच्या सामन्यात सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे.
रशिद खानने आयपीयल बरोबर बिग बॅश लीगमध्येही चांगली गोलंदाजी करत भल्या भल्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे.
मात्र नुकत्याच पार पडलेल्या भारतविरूद्धच्या कसोटी सामन्यात रशिद खानचा भारतीय फलंदाजांसमोर टिकाव लागला नाही.
अफगानिस्तानचा आणि रशिद खानचा हा पहिलाच कसोटी सामना होता. मर्यादित षटकांच्या सामन्यात फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवणारा रशिद खान या कसोटी सामन्यात मात्र पूर्णपणे अपयशी ठरला.
याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टाइम्स ऑफ इंडीया या वृत्तपत्रातील लेखातून रशिद खानने कसोटी क्रिकेटमध्ये प्रभावी गोलंदाज होण्यासाठी अनिल कुबंळेचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला आहे.
“भारताविरूद्धचा कसोटी सामन्यातून रशिदने अचूक टप्यांवर गोलंदाजी केली मात्र त्याला यातून जास्त काही यश मिळाले नाही. या सामन्यात रशिदला कसोटी क्रिकेटमध्ये कशी गोलंदाजी करावी याचे शिकण्यासाठी खूप वाव होता. कसोटी क्रिकेटमध्ये कशी गोलंदाजी करावी यासाठी रशिदने अनिल कुंबळेचे मार्गदर्शन घ्यावे. याचा रशिदला कसोटी क्रिकेटमध्ये चांगला लाभ होईल.” असे भारताच्या माजी कर्णधाराने या लेखात लिहले आहे.
रशिद खानने नुकत्याच झालेल्या बांगलादेश विरूद्धच्या टी-20 मालिकेत अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. 2018 च्या आयपीयलमध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना 17 सामन्यात 21 मिळवले होते.
9 जूनला जाहिर झालेल्या आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत रशिद खानने अव्वल स्थान पटकावले आहे.
महत्वाच्या बातम्या-
–कर्णधार विराट कोहलीशी तुलना होणारा तो फलंदाज डोप टेस्टमध्ये दोषी
–जेव्हा भारतातील सर्वात प्रतिभावान यष्टीरक्षक घेतो जगातील महान यष्टीरक्षकाची भेट!