भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून सौरव गांगुली काही दिवसांपूर्वी पायउतार झाले. बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यपद देखील स्वीकारणार नाहीत. रविवारी (23 ऑक्टोबर) गांगुलींनी कॅब (CAB) च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.
सौरव गांगुली (Sourav ganguly) क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल म्हणजेच कॅबच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर इतर अधिकाऱ्यांना मात्र संधी मिळणार आहे. सौरव गांगुलींच्या या निर्णयानंतर त्यांचे मोठे भाऊ स्नेहाशीष गांगुली (Snehashish Ganguly) या पदावर नियुक्त होऊ शकतात. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देखील गांगुलींनी अर्ज भरला नाही. कारण अध्यक्षाची निवड कॅबच्या बैठकीत केली जाणार आहे.
कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियममध्ये कॅबच्या सौरव गांगुली पत्रकारांनी बोलत होते. यावेळी गागुलींना कॅब अध्यपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले. गांगुली म्हणाले की, “मी म्हणालो होतो, मी तेव्हाच स्वतःची उमेदवारी जाहीर करेल, जेव्हा निवडणूक होणार असेल. निवडणून होणार नाहीये आणि त्यामुळेच सर्वांची निवड बिनविरोध होईल.” दरम्यान, गांगुली मागच्या तीन वर्षांपासून बीसीसीआयच्या अध्यक्षाच्या रूपात कारभार पाहत होते. पण मागच्या आठवड्यात इच्छा नसताना देखील त्याला बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले. बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्यानंतर मागच्या आडवड्यात गागुंलींनी घोषणा केली होती की, ते कॅबचे अध्यक्ष बनण्यासाठी निवडणूक लढवतील.
परंतु कॅबची कार्यकारिणी 31 ऑक्टोबर रोजी वार्षीक सर्वसाधारण बैठकीत नियुक्त केली जाणार असल्यामुळे गांगुली हे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत. “जर मी निवडणूक लढतो, तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना पदे मिळाली नसती. त्यामुळे मी माघार घेतली. मी बिनविरोध निवडलो गेलो असतो. पण हो योग्य नाहीये, असे मला वाटते. ते (कॅबची नवीन कार्यकारिणी) पुढचे तीन वर्ष काम करतील आणि नंतर जे होईल ते पाहू.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पराभव पाकिस्तानचा झळ मात्र ऑस्ट्रेलियाला! भारताकडून 19 वर्ष जुना विश्वविक्रम मोडीत
शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच