चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आज पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील भारतीय संघ त्यांचा दुसरा सामना पाकिस्तानच्या विरुद्ध खेळेल. रविवारी 23 फेब्रुवारी रोजी भारत – पाकिस्तान सामना खेळला जाईल. त्या आधी गुरुवारी 20 फेब्रुवारीला भारत आणि बांगलादेश सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळून स्पर्धेला सुरुवात करेल.
भारत पाकिस्तान सामन्याआधी भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा सर्वात महत्त्वाचा आधार असेल. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
सौरव गांगुली म्हणाले, विराट कोहली चांगलं क्रिकेट खेळत आहे. यात काही शंका नाही. विराट-रोहित पाकिस्तानच्या सामन्यात महत्त्वाची कामगिरी करतील. याशिवाय रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय संघ चांगलं प्रदर्शन करेल. तसेच सौरव गांगुली यांनी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांवर त्यांचे मत मांडले ते म्हणाले भारतीय फलंदाजांना शाहीन आफ्रिदी आणि नसीम शहा यांच्याविरुद्ध वेगळी खेळण्याची तयारी करण्याची काही गरज नाही. भारतीय फलंदाजांनी जागतिक स्तरावर चांगल्या – चांगल्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध खेळी केली आहे.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला आहे. आज पासून स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेचं यजमान पाकिस्तान संघ आहे.
भारतीय संघाला हायब्रीड मॉडेल लागू असल्यामुळे भारतीय संघ त्यांचे सगळे सामने दुबईमध्ये खेळणार आहे. भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध त्यांचा पहिला सामना खेळून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात करेल. भारत-बांगलादेश सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.भारत पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यानंतर भारतीय संघासमोर न्यूझीलंड संघाच आव्हान असेल. भारत आणि न्यूझीलंड संघ 2 मार्चला समोरासमोर असतील.
हेही वाचा
“पाक-न्यूझीलंड सामना पावसाच्या विघ्नात अडकणार?”
वनडे इतिहासात पहिल्यांदाच घडला मोठा पराक्रम, दोन संघांनी मिळून बनवला अनोखा विक्रम
दुःखद बातमी! दिग्गज क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांचे 76व्या वर्षी निधन