भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सौरव गांगुली यांनी आपल्या २ जुन्या मॅनेजमेंट कंपनी परसेप्ट टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड आणि परसेप्ट डी मार्क इंडियन लिमिटेड विरोधात २०१८ मध्ये पैसे मिळण्याचे जे आदेश दिले गेले होते, ते लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या मागणीत असे स्पष्ट केले आहे की, दोन्ही कंपन्यांनी सोमवारी आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा खुलासा करावा असे आदेश लागू करण्यात यावे.
या प्रकरणात न्यायमूर्ती ए.के. मेनन यांच्या एकल न्यायाधीश खंडपीठासमोर कंपन्यांना येत्या २० जुलैपर्यंत मालमत्तेचा तपशील देण्यास सांगण्यात आले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांकडे त्यांचे ३६ कोटी रुपये शिल्लक आहेत. ज्यामधे १४.५० कोटी ही त्यांची मूळ रक्कम आहे, तर उर्वरित रक्कम ही मूळ रक्कम न दिल्याचे व्याज आहे.(Sourav Ganguly moves Bombay High court for enforcement of 2018 arbitration award)
तसेच माजी कर्णधार सौरव गांगुलीने अशी ही मागणी केली आहे की, दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या संपत्तिशी जोडलेल्या कुठेलेही देण्याघेण्याच्या कामावर बंदी घालावी. त्यांनी सादर केलेल्या अर्जात चिंता व्यक्त करत म्हटले की, “या कंपन्यांच्या संचालकांनी पैसे आपल्या खात्यातून दुसऱ्या खात्यात लपवले आहेत.” तसेच परसेप्ट टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड आणि परसेप्ट डी मार्क इंडियन लिमिटेडच्या वकिलांनी म्हटले आहे की, “येत्या २० जुलैपर्यंत संपत्तीशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टी सादर केल्या जातील.”
पुढील सुनावणी २६ जुलैला
दोन्ही कंपन्यांनी मिळून सौरव गांगुलीला १४,४९,९१,००० रुपये द्यायला सांगण्यात आले होते. यासह २१ नोव्हेंबर २००७ पासून १२ टक्के व्याज देण्याचे देखील आदेश देण्यात आले होते. हे व्याज जोपर्यंत मूळ किंमत मिळत नाही, तोपर्यंत सुरू राहणार आहे. सौरव गांगुलीच्या वकिलांनी म्हटले आहे की, “कंपन्यांनी जवळपास २ कोटी रुपये दिले आहेत. आणखी ३६ कोटी शिल्लक आहेत. त्यामुळेच गांगुलीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी होणार आहे.”
महत्वाच्या बातम्या –
‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’
लाॅर्ड्सवर गांगुली त्या खेळाडूला म्हणाला, ‘तू पण टी-शर्ट काढ’
कोण तोडणार सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम? स्वत: ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरने दिले उत्तर