जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याची तयारी करत आहे. या मालिकेचा पहिला कसोटी सामना ४ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. या मालिकेसाठी युवा सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे उपलब्ध असणार नाही. त्याचा बदली खेळाडू म्हणून कोणाला पाठवायचे? या विषयावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
शुबमन गिलच्या पर्यायावर बोलले गांगुली
भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. पण, त्याचा बदली खेळाडू इंग्लंडला पाठवायचा की नाही, यावर अद्याप काहीही निर्णय झाला नाही.
याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना विचारले असता ते म्हणाले, “असल्या कुठल्याही प्रकरणात आम्ही हस्तक्षेप करत नाही. हे सर्व निर्णय संघ व्यवस्थापन घेत असते.”
गिलचा पर्याय म्हणून श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्यात यावे, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, निवड समितीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
भारताचा इंग्लंड दौरा २०२१
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, ओव्हल
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मॅंचेस्टर
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा, शुबमन गिल.
राखीव खेळाडू- अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ७ फूट ४ इंच उंची लाभलेली चौदा वर्षाची बास्केटबॉलपटू, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि श्रीलंकेतील आजवरचा सर्वात रोमांचक वनडे; झाल्या होत्या ८०० पेक्षा अधिक धावा