कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा १३ वा हंगाम प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत सध्या युएईत खेळला जात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. हा सामना तब्बल २० कोटी प्रेक्षकांनी पाहिला. या प्रेक्षक संख्येला बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने अविश्वसनीय म्हटले आहे.
आयपीएलच्या पहिल्या सामन्याला लाभलेल्या प्रेक्षक संख्येबद्दल बोलताना बीसीसीआय अध्यक्ष गांगुली म्हणाला की, मला प्रेक्षकांकडून अशाच प्रतिक्रियेची आशा होती.
गांगुलीचे वक्तव्य
स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट लाईव्ह’दरम्यान बोलताना बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने म्हटले, “हे अविश्वसनीय आहे. यावर मी किंचीतही आश्चर्यचकीत नाही. जेव्हा आम्ही स्टार (ड्रीम ११ आयपीएल २०२० चे अधिकृत प्रसारक) आणि संबंधित सर्व लोकांशी चर्चा करत होतो, तेव्हा यावर्षी आयपीएलचे आयोजन होईल की नाही याबाबत सर्वांना चिंता होती. तसेच बायो- बबलचा अंतिम परिणाम काय असेल यासाठीही चिंता लागली होती.”
“आम्ही आमच्या योजनेसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला. कारण आम्हाला सर्वांच्या आयुष्यात क्रिकेटसोबतच सामान्य स्थिती आणायची होती,” असेही पुढे बोलताना गांगुलीने म्हटले.
आयपीएल जगातील सर्वोत्तम स्पर्धा- सौरव गांगुली
“आयपीएल जगातील सर्वोत्तम स्पर्धा आहे. इतके सारे सुपर ओव्हर झाल्या. आम्ही नुकतीच एक डबल सुपर ओव्हर पाहिली. आम्ही शिखर धवनची फलंदाजी पाहिली, रोहित शर्माला पाहिलं. आम्ही सर्व युवा खेळाडूंना पाहिलं आणि आम्ही केएल राहुलच्या नेतृत्वातील संघ किंग्स इलेव्हन पंजाबचे पुनरागमनही पाहिले,” असे आयपीएलबद्दल बोलताना बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलमध्ये बळींचे शतक पूर्ण करणाऱ्या ‘बुमराह’सोबत अनोखा योगायोग; वाचून शाॅक व्हाल
-आयपीएल स्पर्धेतून माघार घेतलेला सुरेश रैना ‘या’ टीव्ही शोमधून येणार चाहत्यांच्या भेटीला
ट्रेंडिंग लेख-
-Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
-SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय