भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
मागील वर्षी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून सौरव गांगुली यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तीन वर्ष अध्यक्षपद भूषवल्यानंतर मागील सप्टेंबर महिन्यात त्यांना आपल्या पदावरून बाजूला व्हावे लागले. गांगुली यांना आणखी एक कार्यकाळ अध्यक्षपदावर राहण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्या जागी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती केली गेली. अशा स्थितीत गांगुली काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, गांगुली आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील करार पूर्ण झाला असून, लवकरच ते कॅपिटल्स फ्रॅंचाईजीचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट पद सांभाळताना दिसतील. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या संघमालकांचे दक्षिण आफ्रिका टी20 लीग व युएई येथे होऊ घातलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 मध्ये अनुक्रमे प्रिटोरिया कॅपिटल्स व दुबई कॅपिटल्स हे संघ आहेत. त्या संघांसोबतही गांगुली काम करताना दिसतील.
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या गांगुली यांनी यापूर्वी देखील दिल्ली कॅपिटल्ससोबत काम केले आहे. 2019 आयपीएल हंगामात ते संघाचे मेंटर होते. मात्र, बीसीसीआय अध्यक्ष बनल्यानंतर त्यांना हे पद सोडावे लागलेले. आता दिल्ली कॅपिटल्समध्ये ते ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार व एकेकाळी आपला मोठा विरोधक असलेल्या रिकी पॉंटिंग याच्यासोबत रणनीती आखताना दिसतील. दिल्ली कॅपिटल्सकडून मात्र अद्याप या वृत्ताची अधिकृत घोषणा केली गेली नाही.
(Sourav Ganguly Set To Join Delhi Capitals As Director Of Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हाच कॉन्फिडन्स हवा! मालिकेआधीच हार्दिक म्हणतोय, “स्लेजिंगची काय गरज? आम्हाला बघूनच त्यांची…”
बाबर-रिझवानची पाकिस्तान संघातून होणार हकालपट्टी? आफ्रिदीने सुरू केली तयारी