सध्या भारतात रणजी चषकाचे उपांत्यपूर्व सामने सुरू आहेत. यातील बंगाल विरुद्ध झारखंडच्या सामन्यात बंगालचा फलंदाज सुदीप कुमार घरामी याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावले. या शतकाच्या सहाय्याने सुदीपने क्रिकेट प्रेमींना आपल्या प्रतिभेते दर्शन घडवले आहे. मात्र, या शतकवीर सुदीपच्या क्रिकेट कारकिर्दीची कहानी खूप भावुक आहे. युदीपच्या या क्रिकेट कारकिर्दीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा पाठिंबा आहे.
एका न्यूज वेबसाइटशी बोलताना सुदीप कुमारने (Sudeep Kumar Gharami) क्रिकेटर होण्याच्या प्रवासावर प्रकाश टाकला. त्याने सांगितले की, “त्याला लहानपणापासूनच क्रिकेपटू बनायचे होते. मात्र त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्याचे वडील गवंडी कामगार होते. ज्यांना त्याला चांगला क्रिकेपटू बनवायचे होते, पण त्यांच्याकडे तेवढा पैसा नव्हता. ज्यातून सुदीपला चांगल्या क्रिकेट अकादमीतून प्रशिक्षण घेता येईल”
ज्या प्रकारे १९९० मध्ये सौरव गांगुलीने (Sourav Ganguy) रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. त्याचप्रमाणे या खेळाडूने २०२०साली राजकोटच्या खांदेरी स्टेडियमवर सौराष्ट्रविरुद्ध बंगालकडून खेळताना पदार्पण केले आहे. त्यानंतर १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील विश्वचषकात देखील सुदूपला खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे सुदीपच्या क्रिकेट कारकिर्दीत गांगुलीचा मोलाचा वाटा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सुदीपला लहानपणापासूनच क्रिकेटपटू बनायचे होते, पण त्याने कधीही आपली मजबुरी आणि आर्थिक कमकुवतपणा आपल्या स्वप्नांवर लादू दिला नाही. मातीच्या घरात राहणाऱ्या खेळाडूच्या स्वप्नांना पंख लावण्याचे काम आजोबांनी केले. आजोबांच्या दयाळूपणामुळे आणि स्वतःच्या मेहनतीमुळे सुदीपने १९ आणि २३ वर्षांखालील संघात खेळून त्याने बऱ्यांपैकी पैसे कमावले. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बर्याच प्रमाणात सुधारली आहे. मात्र, अजूनही सुदीपचा क्रिकेटमधील संघर्ष संपलेला नाही.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आमचा विराट कोहली’ या व्हायरल कमेंटचे पाकिस्तान खेळाडूने दिले स्पष्टीकरण
क्या बात है! आरसीबीचे २ धुरंधर गाजवतायत रणजी ट्रॉफीचं मैदान, कामगिरी पाहून तुम्हीही कराल कौतुक
‘आम्ही सचिनलाही हेच करताना पाहिलंय…’; इरफान पठानचा उमरानला खास सल्ला