सध्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. टी20 मालिकेत पाहुण्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर वनडे मालिकेला सुरुवात होण्याआधी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा प्रमुख अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने वनडे मालिका तसेच आगामी टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना इंदोर येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार विजय मिळवला. ड्वेन प्रिटोरियसने मुंबई आपल्या नावे केले होते. मात्र, क्षेत्ररक्षणावेळी त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाले होती. त्या दुखापतीबाबतचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून दिलेल्या माहितीनुसार,
#PROTEAS SQUAD UPDATE 🚨
All-rounder Dwaine Pretorius has been ruled out of the three-match ODI series against India and the proceeding ICC Men’s T20 World Cup due to a fracture of his left thumb.#BePartOfIt pic.twitter.com/SZqvx0x5Ro
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 6, 2022
‘ड्वेन प्रिटोरियस डाव्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून तसेच विश्वचषकातून बाहेर झाला आहे.’
प्रिटोरियस दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्या जागी डावखुरा युवा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन याचा संघात समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. जेन्सनचा याआधी विश्वचषकासाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश होता. तो मागील वर्षभरापासून सातत्याने चांगली कामगिरी करतोय. भारताविरुद्धच्या टी20 मालिकेत मात्र त्याला संधी मिळाली नव्हती. जेन्सनने यावर्षी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी शानदार कामगिरी केली होती. तसेच एसए टी20 लीगच्या लिलावात तो तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
टी20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघ-
टेंबा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेन्रिक क्लासेन, रिझा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रिक नॉर्किए, वेन पार्नल, मार्को जेन्सन, कगिसो रबाडा, रायली रूसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स. स्टँडबाय खेळाडू: ब्योर्न फॉर्चुन, अँडिले फेहलुकवायो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य
पांढरे केस, पांढरे जॅकेट अन् हातात माईक, रिची बेनो बोलायला लागले की, ऐकणाऱ्याचे कान व्हायचे तृप्त