टी-२० विश्वचषकातील वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) लढत झाली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक खेळला नाही. डी कॉक ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ या आंदोलनाच्या समर्थनार्थ सामन्याच्या सुरुवातीला गुडघ्यावर बसू इच्छित नव्हता आणि त्यामुळेच त्याने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते. यानंतर त्याच्यावर दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, बोर्ड डी कॉकवर नाराज आहे आणि संघ व्यवस्थापनासोबत चर्चा केल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
तत्पूर्वी दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोमवारी ब्लॅक लाइव्स मॅटर या आंदोलनाला समर्थन देत असल्याची घोषणा केली होती. यानंतर बोर्डाने असा नियम बनवला आहे की, सामन्यापूर्वी सर्व खेळाडू या आंदोलनाच्या समर्थनार्थ गुडघ्यावर बसतील. मात्र, यष्टीरक्षक डी कॉक बोर्डाच्या या निर्णयानंतर निराश झाला असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यातून माघार घेतल्याचे समोर आले आहे. दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डानेही या गोष्टीची पुष्टी केली आहे.
Quinton de Kock not playing because of his stand on BLM movement 😳#BlackLivesMatter #SAvsWI #worldT20 pic.twitter.com/LqC76QKCL3
— DK (@DineshKarthik) October 26, 2021
डी कॉकने घेतलेल्या या निर्णयानंतर त्याच्यावर बोर्ड कारवाई करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच क्रिकेट दक्षिण अफ्रिकाने घोषित केले आहे की, डी कॉकच्या बाबतीत ते संघ व्यवस्थापनाकडून रिपोर्ट मागवून घेतील आणि त्याचा आधारे पुढचे पाऊल उचलतील. दक्षिण अफ्रिका क्रिकेट बोर्डाने सांगितल्याप्रमाणे, टी-२० विश्वचषकातील पुढील सामन्यांमध्येही दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू सामन्याच्या आधी गुडघ्यावर बसतील. अशात डी कॉक या सामन्यामध्ये सहभागी होईल की नाही? हे पाहावे लागणार आहे.
Quinton de Kock has made himself unavailable due to personal reasons
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 26, 2021
I fear we haven't heard the last of the de Kock issue. I won't be surprised if we don't see him in a Protea shirt again.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) October 26, 2021
दरम्यान, डी कॉकने घेतलेल्या या निर्णयानंतर क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये ते म्हणाले की, “मला भीती आहे की, अजून डी कॉकच्या मुद्द्याचा शेवट झालेला नाही. मला कसलेच आश्चर्य वाटणार नाही, आपण डी कॉकला आता दक्षिण अफ्रिकेच्या जर्सीमध्ये पाहिले नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
शाब्दिक युद्धापासून धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंनी मिटवला वाद, प्रशिक्षकांचा खुलासा
३५ चेंडू १६ धावा, टी२० सामन्यात सिमन्स खेळला कसोटी; सडकून होतेय टिका